scorecardresearch

IPL इतिहासात ‘या’ गोलंदाजांनी उघडला पंजा, एकाच सामन्यात घेतले ५ विकेट्स; लिस्टमध्ये पाकिस्तानी खेळाडूचाही समावेश

List Of IPL Players Who Takes 5 Wickets In One Match : आयपीेलमध्ये एकाच सामन्यात पाच विकेट घेण्याची चमकदार कामगिरी कोणत्या गोलंदाजांनी केली? वाचा सविस्तर.

Bowlers Whos Takes 5 Wickets In One IPL Match
या गोलंदाजांनी IPL मध्ये एकाच सामन्यात घेतले ५ विकेट्स. (Image-Indian Express)

Five Wickets In One Match: जगातील सर्वात श्रीमंत लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या सीजनची सुरुवात ३१ मार्च २०२३ पासून होणार आहे. बीसीसीआयने या लीगची सुरुवात २००८ मध्ये केली होती आणि त्यावेळी पाकिस्तानचे खेळाडूही आयपीएमध्ये खेळत होते. पण त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली. आम्ही तुम्हाला आता आयपीएलच्या इतिहासाह एकाच सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत. या लिस्टमध्ये एका पाकिस्तानी खेळाडूच्या नावाचाही समावेश आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात २००८ पासून २०२२ पर्यंत २५ गोलंदाजांनी एका सामन्यात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. या लिस्टमध्ये एका पाकिस्तानी गोलंदाजाचाही समावेश आहे. आयपीएलमध्ये असेही तीन सीजन आहेत, ज्यामध्ये कोणत्याही गोलंदाजाने एका सामन्यात ५ विकेट्स घेतले नाहीत. आयपीएलमध्ये वर्ष २०१०,२०१४ आणि २०१५ मध्ये कोणत्याही गोलंदाजाने एका सामन्यात ५ विकेट्स घेतले नव्हते. पण इतर सीजनमध्ये गोलंदाजांनी पाच विकेट घेण्याची चमकदार कामगिरी केली आहे.

नक्की वाचा – IPL मध्ये भोपळाही फोडला नाही! १४ वेळा शून्यावर झाले बाद; ‘या’ दोन दिग्गज फलंदाजांच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

आतापर्यंत IPL इतिहासात या गोलंदाजांनी घेतले ५ विकेट्स

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळलेल्या सोहे तनवीरने २००८ मध्ये सर्वात पहिल्या लीगमध्ये ५ विकेट्स घेण्याच पराक्रम केला. त्यानंतर २००८ मध्ये एल बालाजी (सीएसके) आणि अमित मिश्राने (डीसी) एकाच सामन्यात पाच विकेट घेतले. त्यानंतर आरसीबीकडून खेळलेल्या दिग्गज अनिल कुंबळेनं २००९ मध्ये एकाच सामन्यात ५ विकेट घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. २०११ मध्ये लसिथ मलिंगा (मुंबई इंडियन्स), हरभजन सिंग (एमआय), इशांत शर्मा (डेक्कन चार्जर) आणि मुंबईच्या मुनाफ पटेलने पाच विकेट घेण्याचा जबरदस्त कामगिरी केली आहे. तर २०१२ मध्ये सीएसकेच्या रविंद्र जडेजाने, पंजाब किंग्जचा दिमित्री मास्करेन्हास, केकेआरचा सुनील नारायणने पाच विकेट्स घेण्याचा कारनामा केला.

२०१३ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या जेम्स फॉकनरने या सीजनमध्ये दोनवेळा पाच विकेट घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. तर २०१३ मध्ये आरसीबीच्या जयदेव उनादकटने पाच विकेट घेतले होते. २०१६ मध्ये रायजिंग पुणेसाठी खेळलेल्या एडम झॅम्पाने पाच विकेट घेतले होते. २०१७ मध्ये गुजरात लायन्सच्या एंड्र्यू टाय, सनरायजर्स हैद्राबादचा भुवनेश्वर कुमार आणि रायजिंग पुणेचा वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटने ५ विकेट घेतले होते. तर २०१८ मध्ये पंजाबच्या अंकित राजपूतने पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये मुंबई इंडियन्सचा अल्जारी जोसेफ आणि २०२० मध्ये केकेआरच्या वरुण चक्रवर्तीने पाच विकेट घेतले होते. २०२१ मध्ये आरसीबीचा हर्षल पटेल, केकेआरचा आंद्रे रसल आणि पंजाबच्या अर्शदीप सिंगने पाच विकेट घेतले. तर २०२२ मध्ये पाच विकेट घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 13:47 IST

संबंधित बातम्या