अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलच्या नव्या पर्वाची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीची धडाकेबाज फलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल अशी क्रिकेटप्रेमींना आशा आहे. दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीचे लाखोंनी चाहते असले तरी त्याच्या निवृत्तीबाबत नेहमीच विचारले जाते. असे असतानाच त्याने फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय.
महेंद्रसिंह धोनीच्या फेसबूक पोस्टमध्ये नेमकं काय?
महेंद्रसिंह धोनी समाजमाध्यमांवर सक्रीय नसतो. सध्या सगळीकडे आयपीएलची चर्चा आहे. महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळतो. विशेष म्हणजे त्याच्यावर या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असते. आयपीएलच्या या हंगामाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. असे असतानाच त्याने फेसबूकवर अवघ्या एका ओळीची पोस्ट टाकली आहे. ‘आयपीएलच्या नव्या हंगामाची मी आतुरतेने वाट पाहतोय. सोबतच मी या हंगामात नव्या भूमिकेत दिसणार असून त्याचीही मला उत्सुकता लागली आहे,’ अशा आशायची पोस्ट धोनीने केली आहे.
या पोस्टच्या माध्यामातून धोनीनी आयपीएलच्या या हंगामात काहीतरी वेगळं घडणार असल्याचे संकेत दिलेत. मात्र ही वेगळी बाब नेमकी काय असेल, हे मात्र त्याने स्पष्टपणे संगितलेलं नाही. त्याचे चाहते तसेच क्रिकेटप्रेमी त्याच्या एका ओळीच्या फेसबूक पोस्टचा नेमका अर्थ लावण्याचा प्रयत्न करतायत. या फेसबूक पोस्टच्या निमित्ताने धोनीच्या निवृत्ताचाही मुद्दा आता समोर आला आहे. तो या हंगामादरम्यान क्रिकेटमधून निवृत्ती घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान, ही वेगळी भूमिका काय असेल याचाही खुलासा धोनी लवकरच करणार आहे. त्यामुळे आता आगामी काळात नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
चेन्नईचा नवा कर्णधार कोण?
महेंद्रसिंह धोनी हा आयपीएलमध्ये यशस्वी कर्णधार राहिलेला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज या संघाला एकूण पाच जेतेपदं मिळवून दिलेली आहेत. यंदाच्या हंगामातही तोच कर्णधारपादची जबाबदारी सांभाळेल अशी अपेक्षा आहे. मात्र धोनीने नव्या भूमिकेचा उल्लेख केल्यामुळे त्याच्याकडे कर्णधारपद असेल का? तो निवृत्त होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केली जातायत. धोनी जर निवृत्त होणार असेल तर चेन्नईचा नवा कर्णधार कोण? याचीही चर्चा आता रंगली आहे.
कर्णधारपदी पुन्हा एकदा रवींद्र जाडेजा?
आयपीएलच्या २०२२ सालच्या हंगामात महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर चेन्नई संघाची जबाबदारी रवींद्र जाडेजावर सोपवण्यात आली होती. काही सामन्यांत जाडेजाने चेन्नईचे नेतृत्व केले होते. मात्र नंतर त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. जाडेजाच्या या निर्णयानंतर चेन्नईचे कर्णधारपद पुन्हा एकदा धोनीकडेच आले होते. त्यामुळे धोनी या हंगामात निवृत्त होणार असेल, तर पुन्हा एखदा चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा जाडेजाकडे सोपवली जाणार का? असेही विचारले जातेय.