Ayodhya Ram Mandir Opening Ceremony : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर अयोध्येत दाखल झाला आहे. सचिनला कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सोमवारी सकाळी सचिन मुंबईहून निघाला होता. सचिनसोबत इतर अनेक क्रिकेटपटूंनाही आमंत्रित करण्यात आले होते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि व्यंकटेश प्रसाद अयोध्येत पोहोचले आहेत.

वास्तविक एक्सवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर दिसत आहे. सोमवारी सकाळी सचिन मुंबईहून अयोध्येला पोहोचला आहे. राम मंदिराच्या कार्यक्रमात तो सहभागी होणार आहे. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे सोमवारी सकाळीच अयोध्येला पोहोचला आहे. याआधी व्यंकटेश प्रसादही पोहोचला आहे. हा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. राम मंदिराशी संबंधित या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी क्रिकेटसोबतच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे.

एका रिपोर्टनुसार टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीही अयोध्येला पोहोचला आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी कोहली हैदराबादमध्ये होता. पण रिपोर्टनुसार तो सरावानंतर अयोध्येला रवाना झाला.

हेही वाचा – Ram Temple : ‘या’ आजी-माजी क्रिकेटपटूंना मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण, जाणून घ्या कोण जाणार अयोध्येला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा आणि माजी दिग्गज धावपटू पीटी उषाही अयोध्येत पोहोचल्या आहेत. यावेळी सायना म्हणाली की, ‘या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते.’ दरम्यान, पीटी उषा म्हणाल्या, ‘आपल्या पूज्य प्रभू रामाच्या जन्मभूमी या पवित्र भूमीवर येऊन मला खूप धन्य वाटत आहे.’