Border Gavaskar Trophy Michael Clarke slam Cricket Australia for ignoring Sunil Gavaskar : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी देण्यातासाठी आमंत्रित न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ही मालिका त्यांच्या नावावरच खेळली जात असल्याने गावस्कर आणि बॉर्डर या दोघांनाही पुरस्कार सोहळ्याला आमंत्रित करायला हवे होते, असे क्लार्कचे मत आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा ३-१ असा पराभव करून १० वर्षांनंतर ही ट्रॉफी जिंकली आणि डब्ल्यूटीसी २०२५ च्या फायनलमध्ये धडक मारली.

मायकल क्लार्क काय म्हणाला?

ईएसपीएन ऑस्ट्रेलियाशी बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल क्लार्क म्हणाला, “मला वाटते की क्रिकेट ऑस्ट्रेलियाची ही युक्ती चुकली आहे. आता मला माहित आहे की बऱ्याच लोकांना हे माहित नाही की मालिका सुरू होण्यापूर्वीच हे नियोजन केले गेले होते, की भारत जिंकला तर सुनील गावस्कर ट्रॉफी प्रदान करतील आणि ऑस्ट्रेलिया जिंकल्यास ॲलन बॉर्डर प्रदान करतील. त्यामुळे त्या दोघांनाही आश्चर्य वाटले नसते.”

दोघांच्या हस्ते ट्रॉफी द्यायला हवी होती –

क्लार्क पुढे म्हणाला, “पण माझ्या मते, हे अनाकलनीय आहे. कारण ते दोघेही तिथे उपस्थित होते. त्यामुळे कोण विजयी झाले हे महत्त्वाचे नाही. माझ्या मते, दोघांनाही मंचावर ट्रॉफी देण्यासाठी आमंत्रित करायला हवे होते आणि दोघांच्या हस्ते ट्रॉफी द्यायला हवी होती. कारण आपण खूप भाग्यवान आहोत की बॉर्डर आणि गावस्कर दोघेही त्यावेळी देशात उपस्थित होते आणि समालोचन करत होते. तुम्हाला ते अनेकदा पाहायला मिळत नाही. ही ट्रॉफी ज्यांच्या नावावर आहे ते दोन्ही दिग्गज उपस्थित आहेत, त्यामुळे तुम्ही ती संधी गमावली आहे. हे खूप विचित्र आहे आणि गावसकर यांनाही ते चांगले वाटले नसावे.”

हेही वाचा – Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहल घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ‘मिस्ट्री गर्ल’सह कॅमेरात कैद, चेहरा लपवतानाचा फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील गावस्करांनी व्यक्त केली होती नाराजी –

ट्रॉफी देण्यासाठी निमंत्रित न केल्याने गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली होती. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर बॉर्डरने ट्रॉफी घरच्या संघाकडे सुपूर्द केली, पण मैदानावर उपस्थित असलेल्या गावस्करांना ट्रॉफी देण्यासाठी आमंत्रित केले नाही. गावस्कर म्हणाले होते की, “मला ट्रॉफी देण्यासाठी आमंत्रित केले असते, तर मला ते करायला आवडले असते.ही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आहे आणि ती भारत आणि ऑस्ट्रेलियाची आहे. माझं म्हणणं आहे कीमी मैदानावर उपस्थित होतो. त्यामुळे ऑस्ट्रेलिया जिंको किंवा भारत त्याने काही फरक पडत नाही. ते जिंकले कारण त्यांनी चांगले क्रिकेट खेळले आणि ते योग्य आहे. पण मी भारतीय आहे म्हणून मला आमंत्रित केले नाही. माझा चांगला मित्र ॲलन बॉर्डरसह ऑस्ट्रेलियाला ट्रॉफी देताना मला आनंद झाला असता.”