भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड संघाचा ८ गडी राखून पराभव करून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. ३५ वर्षांपासून किवी संघाचे भारतात मालिका जिंकण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहिले. टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी सामन्याचा हिरो ठरला. दुखापतीतून परतल्यानंतर या खेळाडूने मागे वळून पाहिलेच नाही. आता शमीने टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला रामबाण उपाय म्हणून महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

उमरान मलिक हा भारताकडून सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज आहे. अलीकडे या तरुणाने असा कहर केला की, विरोधी संघाचे फलंदाज धडपडताना दिसले. इतकेच नाही तर त्याने काही सामन्यांमध्ये आपल्या फायर-ब्रीदिंग बॉल्सने प्रचंड भीती निर्माण केली. पण कुठेतरी अनुभवाचा अभाव आहे. अशात या युवा गोलंदाजाने अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीकडून मार्गदर्शन घेतले. त्यांच्या या संभाषणाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

उमरानला मार्गदर्शन करताना अनुभवी शमी म्हणाला, ”आपण स्वतःवर दबाव येऊ देऊ नये आणि नेहमी आपल्या कौशल्यावर अवलंबून राहावे. जरी, आपण अडचणीच्या काळात भटकू शकतो, परंतु तरीही आपण आनंदी असले पाहिजे. तसेच आपल्या कौशल्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. मला नाही वाटत, तुमच्याकडे असलेल्या वेगाशी खेळणे सोपे वाटत आहे. परंतु तुम्हाला फक्त लाईन आणि लेंथवर थोडेसे काम करण्याची आवश्यकता आहे. जर ते तुम्ही केले, तर आपण जगावर राज्य करु शकतो. तुम्ही चांगली कामगिरी करत आहात आणि पुढे ही करत राहा. त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा.

हेही वाचा – IND vs NZ: मोहम्मद शमीने अनिल कुंबळेशी बरोबरी करताना रचला नवा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला १०वा भारतीय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, शमीने त्याच्या ३ विकेट्सबद्दल सांगताना म्हणाला, ”मी मैदानावर ज्या मार्गाने जातो त्याप्रमाणे गेलो, जास्त कौशल्यामध्ये छेडछाड केली नाही, माझ्या कौशल्यावर विश्वास ठेवला… लाईन आणि लेंथ योग्य ठिकाणी ठेवली… तिच संपूर्ण योजना होती. मी शक्य तितक्या जोरात विकेटवर मारा करण्याचा प्रयत्न करत होतो.”