Mohammed Shami Out Of T20 World Cup 2024 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जागतिक दर्जाच्या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, मोहम्मद शमी बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेत खेळताना दिसण्याची शक्यता आहे. यावरुन स्पष्ट झाले आहे की, शमी आयपीएल २०२४ आणि टी-२० विश्वचषकाला मुकला आहे.

मोहम्मद शमी आयपीएल आणि टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर –

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा मोहम्मद शमी नुकताच टाचेच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनला गेला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली होती. आता बातमी आली आहे की तो बांगलादेशविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या दोन कसोटी आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

Rasikh Salam Dar was reprimanded for breaching the IPL code of conduct
DC vs GT : रसिख सलाम दारला ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने वेगवान गोलंदाजाला फटकारले
Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’

बीसीसीायचे सचिव जय शाहांनी दिली अपडेट –

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “शमीच्या टाचेवरील शस्त्रक्रिया झाली असून तो भारतात परतला आहे. बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी शमीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.” त्याचवेळी जय शाह यांनी भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिल्या कसोटीनंतर जखमी झालेल्या केएल राहुलबद्दलही माहिती दिली.

हेही वाचा – Ranji Trophy 2024 Final : मुंबईची सामन्यावर घट्ट पकड, रहाणेला सूर गवसला

राहुल- ऋषभ पंतसाठी टी-२० विश्वचषक संघाचे दरवाजे उघडे –

केएल राहुलबद्दल बोलताना जय शाह म्हणाले, “यष्टीरक्षक फलंदाजाला इंजेक्शनची गरज आहे, त्याने रिहॅब सुरू केले आहे आणि तो एनसीएमध्ये आहे.” खरं तर, उजव्या चतुष्पादात दुखत असल्यामुळे राहुल इंग्लंड मालिकेतील शेवटच्या चार कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. लंडनमध्ये उपचार घेतल्यानंतर तो आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्सकडून खेळेल अशी अपेक्षा आहे. ऋषभ पंतसाठी टी-२० विश्वचषक संघाचे दरवाजे उघडे असल्याचे जय शाहचे मत आहे. ते म्हणाले, “जर तो विकेटकीपिंग करू शकत असेल तर तो विश्वचषक खेळू शकतो. आधी तो आयपीएल २०२४ मध्ये कशी कामगिरी करतो ते पाहूया.”

हेही वाचा – Arun Dhumal : वर्षातून दोनवेळा IPL होणार का? आयपीएलचे चेअरमन म्हणाले…

२२ मार्चपासून आयपीएल सुरू होणार –

आयपीएलच्या १७व्या हंगामाला २२ मार्चपासून सुरूवात होणा आहे. पहिला सामना आरसीबी आणि गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. गेल्या मोसमात पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने दिल्लीची कमान सांभाळली होती. आता या मोसमात पंत संघाचे कर्णधारपद भूषवतो की नाही हे पाहणे बाकी आहे. त्याचबरोबर केएल राहुलही पुन्हा एकदा लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे.