IND vs SA 2nd T20I Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्‍या टी-२० सामन्यात भारताला मंगळवारी संध्याकाळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा येथे पराभव पत्करावा लागला. पहिल्या पॉवरप्लेमध्येच अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार या दोघांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. दोघांनी १५.५० आणि ११.३३ धावा प्रति षटकाच्या इकॉनॉमीने धावा दिल्या. तर वडिलांची तब्येत खराब असल्याने दीपक चहर खेळत नव्हता. अखेरीस फक्त ७४ धावा बाकी असताना, दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आणि ही स्पर्धा पाच विकेट्सने जिंकली.

सामन्यानंतर, गौतम गंभीरने भारताच्या गोलंदाजीच्या कामगिरीचे विश्लेषण करताना, अर्शदीप सिंगच्या खेळाबद्दल निराशा व्यक्त केली. तर मुकेश कुमारचे कौतुक करताना, विकेट्स घेण्यात त्याचा प्रभाव अर्शदीपपेक्षा जास्त आहे असे गंभीर म्हणाला. सिराजने त्याच्या पहिल्या षटकात १४ धावा काढल्या, तर अर्शदीपने २४ धावा दिल्या. दुसर्‍या षटकात काही प्रमाणात सुधारणा दिसून आली, त्यात ११ धावा झाल्या, सिराजच्या पुढच्या षटकात त्याने हेनरिक क्लासेनची विकेट घेतली त्यासह संपूर्ण सामन्यात २७ धावा देत सिराजने केवळ एकच विकेट आपल्या नावे केली.

गौतम गंभीर पुढे म्हणाला की, “मला वाटतं की मोहम्मद सिराज यापेक्षा खूपच वाईट गोलंदाजी करूनही सामना अधिक चांगल्या आकड्यांसह पूर्ण करू शकतो. पण मी अर्शदीपबद्दल थोडा निराश झालो कारण त्याने पहिले षटक टाकल्यानंतर पॉवरप्ले संपला आणि चेंडू ओला झाला, त्यावर पकड मिळवणे कठीण झाले. मुकेशने जे १३ वे षटक टाकले ते कमाल होते, ओल्या चेंडूसह पिन-पॉइंट यॉर्कर्स आणि ते सुद्धा डेव्हिड मिलर सारख्या खेळाडूविरुद्ध हे निश्चितच सकारात्मक आहे. जर परिस्थिती वेगळी असती, मैदान इतके ओलसर नसते, तर ही गोलंदाजी वेगळी असती.

हे ही वाचा<< “तर मी या देशात का राहू?”, मोहम्मद शमी विश्वचषकातील ‘त्या’ वादावर भडकला; म्हणाला, “तुम्ही सांगाल तिथे जाऊन..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी सहा महिने बाकी असताना, सिराज आणि अर्शदीप हे दोघेही संघात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नात आहेत. गंभीरच्या मते भारताने द्विपक्षीय मालिकेतील निकालांच्या पलीकडे पाहण्याची आणि त्यांच्यासाठी प्रभावी ठरू शकणार्‍या गोलंदाजांचा गट ओळखण्याची वेळ आली आहे. डेड ओव्हर्ससाठी जसप्रीत बुमराहला संघात निश्चित स्थान दिल्याने, सिराज, अर्शदीप आणि दीपक चहर आणि मुकेश यांच्या भोवती इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा आहे. निकालापेक्षा या गोष्टींचे अधिक काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक आहे असा सल्ला गंभीरने दिला.