Mohammed Siraj Throws Ball on Marnus Labuschagne IND vs AUS: भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील गुलाबी चेंडूचा सामना अॅडलेड ओव्हलवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून भारताकडे ९४ धावांची आघाडी आहे तर ऑस्ट्रेलियाने १ विकेट गमावत ८५ धावा केल्या आहेत. यादरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लबुशेन यांच्यात चांगलंच वातावरण तापले होते. मालिकेतील पहिल्या सामन्यातही या दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र यावेळी मोहम्मद सिराजने रागाच्या भरात चेंडू फेकला, सुदैवाने चेंडू मार्नस लबुशेनला लागला नाही.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील २५व्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता, तर लबुशेनकडे स्ट्राईक होती. यादरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलीच बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. या षटकातील चौथ्या चेंडूवर लबुशेन फलंदाजी करत होता, सिराज चेंडू टाकणार होता. सिराजने रनअप घेत अर्ध्या रस्त्यात पोहोचला होचा आणि तितक्यात लबुशेन विकेटपासून दूर गेला आणि त्याला थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे सिराजला मध्येच गोलंदाजी थांबवावी लागली. यामुळे सिराज चांगलाच वैतागला.
लबुशेनवर का भडकला मोहम्मद सिराज?
खरंतर साईड-स्क्रिनच्या इथून एक व्यक्ती काहीतरी सामना घेऊन बाहेर जात होता, त्यामुळे लबुशेनने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र या घटनेनंतर सिराज चिडला आणि त्याने रागाने चेंडू लबुशेनच्या दिशेने फेकला. मात्र, चेंडू कुणालाही लागला नाही. चेंडू फेकल्यानंतर सिराज हातवारे करून त्याला काहीतरी बोलताना देखील दिसला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
ॉ
कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यादरम्यानही या दोन खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली होती. ऑस्ट्रेलियन डावाच्या १३व्या षटकात मोहम्मद सिराज आणि मार्नस लबुशेन यांच्यात वाद झाला होता. सिराजने शॉर्ट लेन्थ बॉल टाकला होता, ज्याचा लबुशेनने बचाव केला होता. यानंतर सिराज चेंडू उचलण्यासाठी लबुशेनकडे गेला, तेव्हा लबुशेनने चेंडू बॅटने दूर ढकलला, त्यानंतर सिराज मैदानातच लॅबुशेनवर चिडला. यावेळी विराट कोहलीही लाबुशेनवर नाराज दिसत होता.
डे नाईट कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ ऑस्ट्रेलियाच्या नावे राहिला. ऑस्ट्रेलियाने भारताला १८० धावसंख्येवर पहिल्याच दिवशी ऑल आऊट केलं. यानंतर ८५ धावांसह ऑस्ट्रेलिया चांगल्या स्थितीत आहे. भारतीय संघाला जर या कसोटीत पुनरागमन करायचे असेल तर संघाला दुसऱ्या दिवशी झटपट विकेट घ्यावे लागतील.