Mohammed Siraj vs Travis Head Heated Aurgument: अॅडलेड ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या डे- नाईट कसोटीत ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने चांगली आघाडी मिळवली आहे. ट्रॅव्हेस हेडने या कसोटीत डे-नाईट कसोटीमधील सर्वात जलद शतक झळकावले आहे. ट्रॅव्हिस हेड १४० धावा करून बाद झाला, पण तत्पूर्वी त्याने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ट्रॅव्हिस हेड १४० धावा करून सिराजच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. या विकेटनंतर या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.

हेडच्या १४० धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येसह या सामन्यात १५७ धावांची आघाडी घेतली. आपल्या घरच्या मैदानावर ॲडलेड ओव्हलवर खेळत असलेला ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या दिवसाच्या खेळात फलंदाजीला आला तेव्हा सुरुवातीपासूनच अतिशय सकारात्मक खेळ करत होता, त्यात त्याने खराब चेंडूंविरुद्ध धावा करण्याची एकही संधी सोडली नाही. इतकंच नाही तर हेडने चांगल्या चेंडूवर पण योग्य रणनितीनुसार फटकेबाजी केली.

हेही वाचा – Mohammed Siraj Fastest Ball: 181.6 kmph… मोहम्मद सिराजने टाकला क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू? स्क्रिनवर दाखवण्यात आलेल्या वेगाचं काय आहे सत्य

प्रथम हेडने मार्नस लबुशेनबरोबर भागीदारी केली. लबुशेन बाद झाल्यानंतर, हेडने एका टोकाकडून वेगाने धावा करणं सुरूच ठेवलं आणि कसोटी क्रिकेटमधील त्याचे ८वे शतक पूर्ण केले. ट्रॅव्हिस हेडची आक्रमक फलंदाजी टीम इंडियाच्या गोलंदाजांसाठी सतत डोकेदुखी ठरत होती. हेड बाद झाला त्या षटकात सिराजच्या गोलंदाजीवर त्याने एक चौकार आणि षटकार लगावला होता.

हेही वाचा – IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?

u

यानंतर पुढच्याच चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला, आपण बाद झाल्याचे पाहून हेडला विश्वास बसला नाही. यानंतर हेड सिराजला काहीतरी म्हणाला, यावर सिराजने देखील उत्तर दिले आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केला. षटकार लागवल्याने सिराज आधीच संतापला होता आणि त्यानंतर हेडच्या बोलण्याने तो अजून वैतागला आणि त्याला प्रत्युत्तर दिलं.

बुमराह-सिराजचे ४-४ विकेट्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात, ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव ३३७ धावांपर्यंत मर्यादित राहिला, ज्यामध्ये भारतीय संघाच्या पहिल्या डावातील १८० धावांच्या तुलनेत त्यांना १५७ धावांची मोठी आघाडीही मिळाली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. ज्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ४, नितीश रेड्डी आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.