भारतीय संघाचा महान माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अनेकदा चर्चेत असतो. आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने केवळ क्रिकेटमध्येच नाही तर इतर अनेक क्षेत्रात नाव कमावले आहे. भारतासाठी अनेक मोठे जेतेपद पटकावणाऱ्या एमएस धोनीला सध्या कोणाच्याही परिचयाची गरज नाही. तो त्याच्या चाहत्यांसाठी प्रेरणास्थान आहे. माहीच्या एका महिला चाहत्याने नुकतेच तिच्या हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर तिचे स्केच बनवून सर्वांना आश्चर्यचकित केले.

चेन्नईमध्ये महिला धोनीच्या चाहत्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर महिला चाहत्याने माहीचे उत्कृष्ट चित्र (स्केच) बनवून सर्वांनाच विचार करायला लावले आहे. महिला चाहत्याचे हे स्केच आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे.

महिलेच्या स्केचवर धोनीची प्रतिक्रिया

महेद्रसिंग धोनीनेही या स्केचवर प्रतिक्रिया दिली आहे. माही म्हणाला, ‘अवयवदान हे अतिशय उदात्त कार्य आहे. हे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकते. एखाद्याला गमावणे खूप दुःखद घटना आहे. आपणच आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावतो त्यावेळीची ती भावना आपण खूप वाईट असते. अवयवदानामुळे एखाद्याला दुसरे जीवन मिळू शकते. या उदात्त कार्यासाठी मी देणगीदार परिवाराचे आभार मानतो.”

हेही वाचा :   T20 World Cup: जे वेस्ट इंडिजला जमले नाही ते झिम्बाब्वेने करून दाखवले, स्कॉटलंडचा पाच गडी राखून पराभव

पुढे एम एस धोनी म्हणतो की, “कावेरी हॉस्पिटलचे हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण युनिट सुरू करण्यासाठी तुम्ही  मला बोलावले आणि माझ्या हस्ते याचे उद्घाटन होत आहे हा एकप्रकारे माझ्यासाठी सन्मानच आहे. अशा अनेक रुग्णाचे प्राण वाचवल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानतो. आपले दुसरे जीवन जगत असलेल्या एखाद्या व्यक्तीचे रेखाचित्र भेटणे ही भावना खूप हृदयस्पर्शी आणि मनाला भिडणारी आहे. डॉक्टरांच्या चमूमुळे हे यशस्वी प्रत्यारोपण शक्य झाले आहे.”

हेही वाचा : डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनने आपल्याच जोडीदाराचा पराभव करून गाठली उपांत्यपूर्व फेरी  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल २०२३ मध्ये तो आपली सर्वोतम खेळी करण्यासाठी सज्ज आहे. काही दिवसांपूर्वी तो रांचीच्या क्रिकेट स्टेडियममध्ये सराव करताना दिसला होता. तो पुन्हा एकदा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद स्वीकारणार आहे. त्यामुळे ही चेन्नई सुपर किंग्स आणि एकूणच धोनीच्या चाहत्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे.