MS Dhoni Die Hard Fan Viral Video On Twitter : चेन्नई सुपर किंग्जचे चाहत्यांनी संपूर्ण आयपीएलमध्ये पिवळ्या रंगाच्या जर्सीत धमाल केली असेल. पण महेंद्रसिंग धोनीचा असा चाहता तुम्ही कधी पाहिला नसेल. गुजरात टायटन्सविरोधात झालेला फायनलचा सामना जिंकून चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचा किताब जिंकला. रविंद्र जडेजाने मोहित शर्माच्या गोलंदाजीवर शेवटच्या दोन चेंडूवर चौकार-षटकार ठोकून सामना खिशात घातला. त्यानंतर सीएसकेच्या चाहत्यांनी संपूर्ण देशभरात शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, धोनीच्या एका जबरा फॅनचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका मुलानं सीएसके जिंकल्याच्या आनंदात रुममध्येच धुगडूस घातला. आनंदाच्या भरात त्याने दरवाजा तोडला आणि सर्वत्र जल्लोष केला. त्या चाहत्याचा आनंदाला पारावर न उरल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या पठ्ठ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. आयपीएलच्या फायनलबाबत बोलायचं झालं तर, चेन्नईने हा सामना जिंकून आयपीएलच्या इतिहासात पाचव्यांदा चॅम्पियन झाल्याची नोंद केली आहे.

नक्की वाचा – अखेर सत्य आलं समोर! शेवटचे दोन चेंडू राहिले असताना हार्दिक पांड्याने मोहित शर्माला काय सांगितलं? गोलंदाजाने केला मोठा खुलासा

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई इंडियन्सनंतर पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकण्यात चेन्नईच्या संघाला यश आलं आहे. हा सामना श्वास रोखून धरणारा होता,त्यामुळे संपूर्ण क्रिडाविश्वात हा सामना अविस्मरणीय ठरला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. मोहित शर्माने पहिले चार चेंडू अचूक टप्प्यावर फेकल्याने फलंदाजांची तारंबळ उडाली. परंतु, जडेजाने शेवटच्या दोन चेंडुवर चौकार-षटकार ठोकून चेन्नईला सामना जिंकवून दिला. सामना संपल्यानंतर धोनीनं सर्व चाहत्यांचे आभार मानत मैदानात फेरफटका मारला.