भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय संघाला टी-२० विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकवून देणारा यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख संपूर्ण जगाला आहे. धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर श्रीलंकेवर मात करत २८ वर्षांनी विश्वचषक जिंकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पार्थ पवार यांची धोनीच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया, म्हणाले…

धोनीच्या यशस्वी कारकिर्दीला चहूबाजुनी सलाम करण्यात येत आहे. पाकिस्तानचा दमदार फलंदाज बाबर आझम याने धोनीला ट्विटच्या माध्यमातून मानवंदना दिली. “धोनी, तू घडवलेल्या समृद्ध अशा क्रिकेट करकीर्दीबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन! तुझे नेतृत्वकौशल्य, लढाऊवृत्ती आणि खेळातील प्रतिभा कायम लक्षात ठेवली जाईल. तुझ्या पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा”, असे ट्विट करत बाबर आझमने धोनीला सलाम केला.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, रवी शास्त्री आणि परदेशी खेळाडूंनीही धोनीच्या क्रिकेटमधील योगदानाला सलाम केला. क्रीडा, राजकारण, सामाजिक क्षेत्र, बॉलिवूड साऱ्याच क्षेत्रांतून धोनीच्या योगदानाला सलाम करण्यात आला आणि त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. धोनीचा चेन्नई सुपर किंग्जचा सहकारी सुरैश रैना यानेही धोनीनंतर अवघ्या काही तासांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni retirement pakistan babar azam salutes dhoni contribution in world cricket vjb
First published on: 18-08-2020 at 10:10 IST