Taurian World School Ranchi: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मुलगी जीवा अनेकदा त्याच्यासोबत दिसते. महेंद्रसिंग महेंद्रसिंग धोनीची आठ वर्षांची आहे. लहान वयातही झिवाची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. झिवाने आता शाळेत जायला सुरुवात केली आहे. माही आणि साक्षी यांची मुलगी झिवा, ज्या शाळेत शिकते ती शाळा रांची शहरातील सर्वात मोठ्या शाळांपैकी एक आहे. चला तर मग तिच्या शाळेबद्दल आणि फीबद्दल जाणून घेऊया.

टॉरियन वर्ल्ड स्कूल मध्ये शिकते झिवा –

एमएस धोनीची मुलगी झिवा आठ वर्षांची आहे. ती रांचीच्या टॉरियन वर्ल्ड स्कूलमध्ये इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी आहे. ही शाळा रांचीमधील टीव्हीएस इंटरनॅशनल स्कूल म्हणूनही ओळखली जाते. ही शाळा रांची शहरातील सर्वात मोठ्या शाळांपैकी एक आहे. टीव्हीएस शाळा ही सीबीएसई बोर्ड असून २००८ मध्ये रांची येथे स्थापन झाली आहे. या शाळेत सर्व प्रकारच्या जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत.

शाळेची फी किती आहे?

महेंद्रसिंग धोनीच्या मुलीच्या शाळेची माहिती मिळाली आहे. इंटरनेटवरील मिळालेल्या माहितीनुसार, झिवाच्या टॉरियन वर्ल्ड स्कूलची पहिली ते पाचवीपर्यंतची वार्षिक फी २ लाख ९५ हजार रुपये आहे, म्हणजे एका महिन्याची फी सुमारे २५ हजार रुपये आहे. सध्या झिवा ही इयत्ता तिसरीची विद्यार्थी आहे. टॉरियन वर्ल्ड स्कूल एक बोर्डिंग स्कूल आहे. ज्याची फी देखील वार्षिक ४ लाख ७० हजार रुपये आहे. मात्र झिवा रोज तिच्या घरून शाळेत जाते.

हेही वाचा – Global T20 Canada: मोहम्मद रिझवानच्या स्लेजिंगमुळे इफ्तिखार अहमदने गमावली विकेट, VIDEO होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झिवाचा जन्म दिल्लीत झाला –

झिवा धोनीचा जन्म २ फेब्रुवारी २०१५ रोजी दिल्लीत झाला होता. महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी अनेकदा झिवाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतात. झिवा तिचे आई-वडील आणि आजी-आजोबांसोबत रांचीमध्ये राहते. झिवा इंस्टाग्रामवर २.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. झिवा देखील आयपीएल सामन्यांदरम्यान तिच्या पालकांसोबत दिसत असते.