MI-W Vs UPW-W Viral Video : यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काल मुंबईच्या बेब्रॉन स्टेडियमध्ये महिला प्रीमियर लीगचा १० वा सामना रंगला. यूपी वॉरियर्सची कर्णधार अॅलिसा हिलीच्या अर्धशतकाच्या जोरावर यूपीने मुंबईला १६० धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांनी यूपीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. कर्णधार हरमीनप्रीत कौरच्या धडाकेबाज अर्धशतकामुळं, तसेच यास्तिका भाटिया आणि सिवर ब्रंटच्या आक्रमक खेळीने मुंबईला १६० धावांचं लक्ष्य गाठून दिलं. मुंबईने डब्ल्यूपीएलमध्ये सलग चौथ्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पण या सामन्यात सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकरावे षटक सुरु असताना मुंबईची कर्णधार हरमनप्रीतने दुसऱ्या चेंडूचा सामना केला. अंजली हे षटक टाकत असताना हरमनप्रीत अवघ्या ७ धावांवर होती. पण षटकातील दुसरा चेंडू हरमनप्रीतला लेग साईडच्या दिशेनं चकवा देत थेट स्टंपला लागला. चेंडू स्टंपला लागल्यानंतर एलईडी लाईटही लागली. पण स्टंपवर असलेल्या बेल्स पडल्या नाहीत आणि सर्व खेळाडू बघतच राहिले. त्यानंतर अंपायरने चेंडू वाईड असल्याचा निर्णय दिला.

नक्की वाचा – WPL 2023 : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा विजय, कर्णधार हरमनप्रीतच्या वादळी खेळीमुळं यूपी वॉरियर्सचा पराभव

इथे पाहा व्हिडीओ

मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हरमनप्रीत कौर ( नाबाद ५३ धावा) आणि नेट सिवर ब्रंटने (नाबाद ४५ धावा) तिसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागिदारी केली. मुंबईने १७.१ षटकात २ विकेट्स गमावत १६० धावांचं लक्ष्य गाठलं आणि यूपीचा पराभव केला. हरमनप्रीतने ३३ चेंडूंच्या नाबाद ५३ धावांच्या खेळीत ९ चौकार आणि एक षटकार ठोकला. सिवर ब्रंटने ३१ चेंडूत ४५ धावा कुटल्या. सिवरने ६ चौकार आणि १ षटकार मारला. मुंबईचा या टूर्नामेंटमेंटमध्ये सलग चौथा विजय झाल्याने गुणतालिकेत ८ गुणांसह मुंबई इंडियन्स अव्वल स्थानावर पोहोचली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indian skipper harmanpreet kaur not out even after ball hitting on stumps watch wpl 2023 viral video nss
First published on: 13-03-2023 at 14:07 IST