पुरुषांमध्ये रायगड विजयी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी रेडर्स संघाने मुंबई महाकाळ संघाला २२-२१ असे नमवत अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला आणि म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या महाकबड्डी लीगच्या दुसऱ्या पर्वाची महिला विभागाची अंतिम फेरी गाठली. त्यांचा अंतिम सामना रायगड डायनामोजशी होणार आहे. याचप्रमाणे मंगेश भगत, राजेंद्र देशमुख यांनी केलेल्या चपळ चढाया आणि आरिफ सय्यदच्या पकडींच्या बळावर रायगड डायनामोज पुण्याचा ४०-२० असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांची अंतिम फेरीत ठाणे टायगर्सशी गाठ पडणार आहे.

महिलांच्या उपांत्य लढतीत सायली जाधवचा अष्टपलू खेळ, शिरिषा शेलारच्या चौफेर चढाया व त्यांना लाभलेली कोमल जोरीच्या पकडींची साथ यांच्या जोरावर मध्यंतराला रत्नागिरी संघाने १२-६ अशी आघाडी घेतली होती. सुरुवातीला दोन्ही संघानी अत्यंत संयमी खेळ करीत गुण मिळवण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या पूर्वार्धात ११व्या मिनिटाला रत्नागिरीच्या आरती यादवने बोनस गुणासह दोन गुण मिळवत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र मध्यंतरानंतर मुंबई महाकाळच्या सायली केरीपाळेचा अष्टपलू खेळ व श्रद्धा चव्हाणने उत्कृष्ट प्रतिकार केला. परंतु बचाव फळीची पुरक साथ न मिळाल्याने मुंबई संघाला पिछाडीवर राहवे लागले. मध्यंतरानंतर एकच मिनिटात रत्नागिरीच्या सायली जाधवने एक गुण घेत मुंबईवर लोण चढवत १६-७ अशी आघाडी घेतली. मात्र शेवटचे पाच मिनिटे बाकी असताना सायली केरीपाळेची रत्नागिरीच्या कोमल जोरीने पकड करीत आघाउी घेतली. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना सायली केरीपाळेने जोरदार खेळ करीत रत्नागिरी संघावर लोन चढवत २०-२१ अशी पिछाडी भरून काढली. यानंतर सायलीने आणखी एक बोनस मिळवत संघाच्या आशा जिवंत ठेवल्या. शेवटच्या मिनिटात रत्नागिरीकडे २२-२१ अशी आघाडी होती. यावेळी सायली बोनस झाल्याच्या संभ्रमात परतली. मग शेवटच्या चढाईत रत्नागिरीच्या सायली जाधवने वेळ काढला व सामना एका गुणाने जिंकला.

पुरुषांमध्ये सामन्याच्या सातव्या मिनिटालाच रायगडने १०-३ अशी आघाडी घेतली. त्याला राजेंद्र देशमुखच्या चढाया, आरीफ शेख व परेश म्हात्रेने केलेल्या पकडींची चांगली साथ मिळाली. सुरुवातीपासून रायगडच्या संघाने पुणे संघावर आक्रमण करीत दबाव निर्माण केला. दडपणाखाली खेळताना पुण्याच्या सुनील लांडगेचा अपवाद वगळता फारसा कोणाचाही खेळ बहरलाच नाही. १२व्या मिनिटाला रायगड संघाने पुणे संघावर दुसरा लोण चढवत १९-३ अशी भक्कम आघाडी घेतली होती. रायगडच्या मंगेश भगत, राजेंद्र देशमुख व सुलातान डांगेने केलेल्या चढाया आणि परेश म्हात्रेने घेतलेल्या पकडीमुळे रायगड संघाला आपली आघाडी वाढवता आली. मध्यंतराला रायगडकडे २३-७ अशी आघाडी घेतली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai vs ratnagiri kabaddi match
First published on: 01-10-2016 at 00:35 IST