Musheer Khan: भारतीय खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये आहेत. भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. तर महिलांचा संघ इंग्लंडविरूद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. यासह भारताचा १९ वर्षांखालील संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर आहे. दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उदयोन्मुख खेळाडूंचा संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचा संघ पुढील एका महिन्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. या संघात सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खानचा देखील समावेश आहे. २० वर्षीय मुशीरने आपल्या पहिल्याच सामन्यात दमदार शतकी खेळी केली आहे. मुशीरने मुंबई क्रिकेट असोसिएशन विरूद्ध नॉटींघमशायर सेकंड इलेव्हन यांच्यात झालेल्या सामन्यात हा कारनामा केला आहे. आपल्या खेळीदरम्यान त्याने १२७ चेंडूंचा सामना केला आणि १४ चौकारांच्या मदतीने दमदार शतकी खेळी केली. या खेळीसह त्याने दाखवून दिलं आहे की, तो भारतासह परदेशातही आपल्या फलंदाजीचा ठसा उमटवू शकतो.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उदयोन्मुख खेळाडूंचा संघ एका महिन्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. यादरम्यान युवा खेळाडूंना आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने छाप सोडण्याची संधी असणार आहे. यादरम्यान मुंबईचा संघ इंग्लंडमधील क्लब्ससोबत पाच २ दिवसीय आणि चार एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. मुंबईचे सामने हे इंग्लंडमधील वॉर्सेस्टरशर आणि ग्लुस्टरशरसारख्या संघाविरूद्ध होणार आहेत.

मुशीर खानची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी

मुशीर खानला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फार सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण, कमी सामन्यांमध्येच त्याने आपली छाप सोडली आहे. मुंबईकडून खेळताना त्याने ९ सामन्यांमध्ये ७१६ धावा केल्या आहेत. यारम्यान त्याने १ शतक आणि ३ अर्धशतकं झळकावली आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने ८ गडी बाद केले आहेत.

इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे मुंबईचा उदयोन्मुख खेळाडूंचा संघ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्यांश शेडगे (कर्णधार), वेदांत मुरकर (उपकर्णधार), अंगकृष रघुवंशी, आयुष वर्तक, प्रतीक कुमार यादव, प्रेम देवकर, प्रिंस बदियानी, जेद पाटणकर, हृषिकेश गोरे, हर्षल जाधव, आयुष जिमारे, हिमांशु सिंग, मनन भट्ट, मुशीर खान, निखिल गिरी, प्रग्नेश कनपिल्लेवार.