माद्रिद : तंदुरुस्तीच्या कारणास्तव राफेल नदालने आगामी विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा आणि टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेतून माघार घेतली आहे. नदालने फ्रेंच स्पध्रेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. परंतु नोव्हाक जोकोव्हिचविरुद्ध पराभवामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले. नदालने दोनदा विम्बल्डन जेतेपद पटकावले आहे. याचप्रमाणे २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ‘‘कारकीर्दीत दीर्घकाळ आनंदाने खेळत राहण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. फ्रेंच स्पध्रेनंतर दोन आठवडय़ांत विम्बल्डनसाठी सज्ज होणे माझ्यासाठी सोपे नाही,’’ असे नदालने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2021 रोजी प्रकाशित
नदालची विम्बल्डन आणि ऑलिम्पिक स्पध्रेतून माघार
फ्रेंच स्पध्रेनंतर दोन आठवडय़ांत विम्बल्डनसाठी सज्ज होणे माझ्यासाठी सोपे नाही,’’ असे नदालने सांगितले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-06-2021 at 02:33 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nadal withdraws from wimbledon and olympics zws