बांग्लादेशविरूध्दच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेच्या नुवान तुषाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात तुषाराने पहिल्याच षटकात तीन विकेट घेत बांगलादेशचा पराभव केला. त्याच्या धारदार गोलंदाजीने बांगलादेशची फलंदाजी फळी हादरली. पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो श्रीलंकेचा पाचवा गोलंदाज ठरला. तुषाराला आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने ४ कोटी रूपयांना संघात सामील केले आह.

चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नझमुल शांतोला बाद करून नुवान तुषाराने हॅट्ट्रिकची सुरुवात केली. त्याने शांतोला बाद केल्यानंतर तोहिदला क्लीन बोल्ड केले. पुढच्याच चेंडूवर तुषाराने अनुभवी फलंदाज महमुदुल्लालाही बाद केले. महमुदुल्लाहने रिव्ह्यू घेतला पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि या फॉरमॅटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तुषारा अजून एक यशस्वी गोलंदाज ठरला. नुवान तुषारा हा हॅट्ट्रिक घेणारा श्रीलंकेचा पाचवा गोलंदाज ठरला आहे.

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या लिलावादरम्यान, मुंबई इंडियन्सने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराला ४.८ कोटी रुपयांना विकत घेतले. आगामी आयपीएलमध्ये सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील. त्यापूर्वीच नुवानची हॅटट्रिक मुंबई इंडियन्ससाठी एक चांगली बातमी ठरली आहे. कारण मुंबईच्या संघाने यंदाच्या मोसमात त्यांच्या गोलंदाजी बाजूत मोठा बदल केला आहे.

तुषाराने २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याची गोलंदाजी श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू लसिथ मलिंगासारखी आहे. तुषाराने २०१५-१६ मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले. २०१७-१८ मध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०२० मध्ये नुवान तुषाराला पहिल्या लंका प्रीमियर लीग हंगामात गॅले ग्लॅडिएटर्सने विकत घेतले. नुवान तुषाराने बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यापूर्वी त्याने ६८ टी-२० सामन्यात ११५ विकेट घेतल्या आहेत. तुषाराने आतापर्यंत श्रीलंकेसाठी ८ टी-२० सामने खेळले असून त्यात त्याने ११ विकेट घेतल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलामीवीर कुसल मेंडिसचे ८६ धावांचे अर्धशतक आणि वेगवान गोलंदाज नुवान तुषाराच्या हॅट्ट्रिकसह कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीमुळे श्रीलंकेने तिसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केला. त्याने २० धावांत ५ बळी घेतले. या विजयासह श्रीलंकेने मालिकाही २-१ ने जिंकली. श्रीलंकेने पहिला सामना तीन धावांनी जिंकला पण बांगलादेशने दुसरा सामना आठ विकेटने जिंकून बरोबरी साधली होती.