Virat Kohli statue Kiss: भारतीय संघाचे ‘रन मशीन’ आणि माजी कर्णधार विराट कोहलीचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. स्टेडियममध्ये अत्यंत कडक सुरक्षा असूनही काही चाहते मैदानावर पोहोचले आहेत. जागतिक क्रिकेटवर राज्य करणाऱ्या कोहलीची क्रेझ अशी आहे की, चाहते त्याच्या फोटोंना अनेकदा किस करताना दिसतात. आता या महिला चाह्तीचेच घ्या. तिने कोहलीच्या पुतळ्याला किस केले.

महिला फॅन जेव्हा किस करत होती तेव्हा त्यांनी व्हिडिओ शूटही करून घेतला. या क्षणाचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. यावर अनेक मजेशीर कमेंट्सही येत आहेत. हा व्हिडिओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला हे सांगणे कठीण आहे. पण ज्या कमेंट्स येत आहेत त्या आश्चर्यकारक आहेत. एका महिला युजरने कमेंट केली. “हे पाहण्याआधी तिचा मृत्यू का झाला नाही.”

दुसर्‍या यूजरने लिहिले की, “पुतळे देखील त्यांच्यापासून सुरक्षित नाहीत. बरं, विराट कोहली सध्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी २०२३ अंतर्गत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.” कोहलीची फलंदाजी त्या पातळीवर होत नसली तरी पण असे असतानाही त्याने सचिन तेंडुलकरचा सर्वात वेगवान २५ हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विश्वविक्रम त्याने मोडला आहे. दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ४४ धावा केल्या होत्या. येथे थोडा दुर्दैवी होता आणि वादग्रस्तपणे एलबीडब्ल्यू देण्यात आला.

तिसऱ्या एका यूजरने म्हटले की, “क्रिकेटच्या मैदानात सुरक्षेच्या कारणास्तव चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटू शकत नाहीत. मात्र, जागतिक क्रिकेटवर आपले वर्चस्व गाजवणाऱ्या किंग कोहलीच्या एका महिला फॅन पडली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.” अशा अनेक कमेंट्स भन्नाट व्हिडीओवर येत आहेत. खरं तर ही फॅन किंग कोहलीच्या पुतळ्याला किस करताना दिसत आहे.

हेही वाचा: IND vs AUS: “भारताला हरवणे कठीण!” पाकिस्ताननेही ओळखली टीम इंडियाची ताकद, माजी PCB प्रमुखांची ऑस्ट्रेलियावर सडकून टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी कोहलीचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. इंदोर आणि अहमदाबादमध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. कोहली सोशल मीडियावर फॉलो केला जाणारा जगातील सर्वात मोठा स्पोर्ट्स स्टार आहे. दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदीरत विचार केला तर नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांवर गुंडाळला. त्यानंतर भारताने त्यांच्या पहिल्या डावात २६२ धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियान संघ अवघ्या ११३ धावांवर गुंडाळला गेला. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने तीन, तर रविंद्र जडेजाने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सात विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताला विजयासाठी ११५ धावाचे लक्ष्य मिळाले, हे ४ विकेट्सच्या नुकसानावर भारतीय संघाने गाठले.