महिला टी२० आशिया चषकाचे नुकतेच वेळापत्रक जाहीर झाले असून बांगलादेशमध्ये १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. महिला टी२० आशिया चषक १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे तर १५ ऑक्टोबरला त्याचा अंतिम सामना असणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी मंगळवारी महिला टी२० आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर केले. यावेळी पुरुषांपाठोपाठ महिला आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला होईल. ७ ऑक्टोबरला भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होईल.

बांगलादेश मध्ये पुढील महिन्यापासून महिला टी२० आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आशिया कपमध्ये भारताचा सामना ७ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने आयोजित केली जाईल. ज्या अंतर्गत अव्वल चार क्रमांकावर असलेले संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्याचबरोबर आशिया चषकमध्ये भारत-पाकिस्तान, यजमान बांगलादेश, श्रीलंका, यूएई, थायलंड आणि मलेशियाचे संघ सहभागी होणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या अत्याचाराला बळी पडत असलेल्या महिलांना तेथील सरकाने परवानगी नाकारल्याने अफगाणिस्तानचा महिला संघ आशिया चषक मध्ये खेळणार नाही. आशिया चषकाचा पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात १ ऑक्टोबरला होणार आहे.