Embarrassing Record In IPL History : आयपीएलच्या इतिहास अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत अनोख्या विक्रमांना गवसणी घातली आहे. कधी फलंदाज गोलंदाजांची धुलाई करतात, तर कधी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं फलंदाज नांगी टाकतात. पण काही खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळं आयपीएलच्या इतिहासात लाजिरवाण्या विक्रमांची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये अशाप्रकारचे विक्रम नोंदवले गेले आहेत, ज्यांना खेळाडू कधीच विसरू शकत नाहीत.

‘या’ दोन गोलंदाजांनी फेकलं १० चेंडूंचं षटक

आयपीएलमध्ये दोनवेळा एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. ज्यांना खेळाडू कधीच विसरू शकणार नाहीत. टू्र्नामेंटच्या इतिहासात फक्त १० वेळा असं घडलं आहे, जेव्हा वेगवेगळ्या गोलंदाजांनी १० चेंडूंचं एक षटक फेकलं आहे. या लिस्टमध्ये एका भारतीय खेळाडूचाही समावेश आहे.

राहुल तेवतिया

आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना राहुल तेवतियाने आरसीबी विरुद्ध अत्यंत खराब गोलंदाजी केली. तेवतियाने इनिंगमधील ९ वं षटक टाकलं. पण या षटकात त्याला १० चेंडू टाकावे लागले. त्याच्या या षटकाचा सामना विराट कोहली आणि देवदत्त पड्डीकलने केला. या षटकात आरसीबीला ८ धावा मिळाल्या. तेवतियाने या षटकात ३ वाईड आणि एक नो बॉल टाकला. तेवतियाने सलग तीन वाईड फेकले. आरसीबीने हा सामना ७ विकेट्सने जिंकला.

नक्की वाचा – …म्हणून ‘या’ तीन संघांना IPL मध्ये चॅम्पियन बनता आलं नाही; जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

राहुल तेवतियाचं षटक

८.१ – डॉट बॉल
८.२ – डॉट बॉल
८.३ – नो बॉल (एक रन)
८.३- एक रन
८.४ – दोन रन
८.५ – वाईड (एक रन)
८.५ – वाईड (एक रन)
८.५ – वाईड (एक रन)
८.५ – (एक रन)
८.६ – डॉट बॉल

ड्वेन ब्रावो

वेस्टइंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोनेही आयपीएलमध्ये १० चेंडूंच एक षटक फेकलं होतं. २०२१ मध्ये चेन्नई सुपरि किंग्जकडून खेळताना राजस्थान रॉयल्स विरुद्ध ब्रावाने अनोख्या विक्रमाची नोंद केली. ब्रावोने एका षटकात चार वाईड चेंडू फेकले होते. ब्रावोचा सामना शिवम दुबे आणि जोस बटलर करत होते. ब्रावोने या षटकात एकूण ६ धावा दिल्या. हा सामना सीएसकेने ४५ धावांनी जिंकला होता.

ड्वेन ब्रावोचं षटक

१०.१ – वाई़ड (एक रन)
१०.१ – वाईड (एक रन)
१०.१ – डॉट बॉल
१०.२ – डॉट बॉल
१०.३ – एक रन
१०.४ – डॉट बॉल
१०.५- एक रन
१०.६ – वाईड (एक रन)
१०.६ – वाईड (एक रन)
१०.६ – डॉट बॉल