भारताप्रमाणेच पाकिस्ताननेही ‘यंगिस्तान’वर भरवसा ठेवत विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला असून उमर गुल, शोएब मलिकसह कामरान अकमलला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गोलंदाजीची शैली वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने फिरकीपटू सईद अजमलने माघार घेतल्याने पाकिस्तानची गोलंदाजी कमकुवत झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील खेळपट्टय़ांचे स्वरूप लक्षात घेऊन पाकिस्तानने पाच वेगवान गोलंदाजांना संघात समाविष्ट केले आहे. संघ : मिसबाह उल हक (कर्णधार), मोहम्मद हफीझ, अहमद शेहझाद, युनिस खान, हॅरिस सोहेल, उमर अकमल, सोहेब मकसूद, सर्फराझ अहमद, शाहिद आफ्रिदी, जुनैद खान, मोहम्मद इरफान, सोहेल खान, वहाब रियाझ, एहसान आदिल आणि यासिर शाह.