Shahnawaz Dahani’s Post: भारताचा माजी कर्णधार आणि विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ११ जानेवारी २०२३ रोजी आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. जगभरातील सर्व दिग्गज क्रिकेटपटूंनी राहुल द्रविडला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, परंतु यादरम्यान पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीने द्रविडबद्दलचा एक किस्सा शेअर केला. राहुल द्रविडला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दहानीने ट्विटरवर द्रविडसोबत एक फोटो शेअर केला. त्याने फोटोसह जे काही लिहिले त्यांनी लोकांची मने जिंकली.

दहानीने लिहिले, ”सर्वात नम्र व्यक्ती राहुल द्रविड सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. या फोटोमागे एक कथा आहे. विश्वचषकादरम्यान मी माझ्या मित्रांसोबत ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील एका रेस्टॉरंटमध्ये जेवत होतो. त्याच रेस्टॉरंटमध्ये राहुल द्रविड सर आले आणि त्यांनी मला पाहिले.”

दहानी पुढे लिहिले, ”स्वतःसाठी खुर्ची घेण्यापूर्वी ते स्वतः माझ्याकडे आले आणि आम्हा सर्वांना अगदी सहज भेटले. आम्ही सर्वांनी त्यांच्यासोबत फोटो क्लिक केले. कल्पना करा की विरोधी संघाचे प्रशिक्षक आणि क्रिकेटची भिंत राहुल द्रविड सर येऊन तुमच्याशी आणि तुमच्या मित्रांशी संवाद साधतात. त्या दिवशी मी शिकलो की नम्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे.”

हेही वाचा – Coaching Beyond: फक्त ‘या’ व्यक्तीला धोनीच्या शेवटच्या सामन्याबद्दल माहित होते, आर श्रीधरांचा खुलासा

हेही वाचा – IND vs SL 2nd ODI: सामन्यादरम्यान स्क्रीनवर असे काय दिसले? ज्यामुळे राहुल द्रविडला हसू फुटले, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहनवाज दहानी याने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर चाहत्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत.
शाहनवाज दहानीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, या गोलंदाजाने आतापर्यंत पाकिस्तानसाठी २ वनडे आणि ११ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याच्याकडे १ विकेट आहे, तर दहानीने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ८ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय दहानीच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ५४ विकेट्स आहेत. शाहनवाज दहाणी हा पाकिस्तानी क्रिकेटचा उदयोन्मुख गोलंदाज आहे.