India vs Australia Test Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना १ मार्च २०२३ पासून खेळवला जाणार आहे. हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला आहे. वास्तविक संघाचा कर्णधार पॅट कमिन्स या सामन्यातून बाहेर आहे. कौटुंबिक अडचणींमुळे तो काही दिवसांपूर्वी घरी परतला होता. त्याचवेळी त्याच्या अनुपस्थितीत संघाचा अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

पॅट कमिन्सने क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मानले आभार –

इंदूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघातून वगळल्यानंतर पॅट कमिन्सने आपले वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. मी भारतात न जाण्याचा निर्णय घेतल्याचे कमिन्सने म्हटले आहे. यावेळी माझ्या कुटुंबासोबत असणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याच वेळी, त्याने असेही म्हटले की क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या अद्भुत पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार.

कमिन्सच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणारा स्टीव्ह स्मिथही दिल्ली कसोटीनंतर पत्नीसोबत दुबईला गेला होता. त्याला या निर्णयाची माहिती देण्यात आली असून तो आता भारतात परतत आहे. स्टीव्ह स्मिथ हा अनुभवी खेळाडू असून त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक मोठे सामने जिंकले आहेत.

बॉर्डर गावसकर ट्रॉफी २०२३ मधील स्थिती –

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले आहेत. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दुसरा सामना दिल्लीमध्ये खेळला गेला. या सामन्यात देखील भारताने ऑस्ट्रेलियावर ६ विकेट्सने विजय मिळावला. त्यामुळे भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना इंदूर आणि चौथा सामना अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.

इंदूर कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ –

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅश्टन अगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क मिशेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंदूर कसोटीसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.