प्रो कबड्डी लीग (PKL 2021) च्या ४७व्या सामन्यात, पाटणा पायरेट्सने यू मुंबाचा ४३-२३ असा पराभव करून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले. पाटणा पायरेट्सचा आठ सामन्यांमधला हा सहावा विजय आहे, तर यू मुंबाचा आठ सामन्यांमधला हा दुसरा पराभव आहे. यू मुंबाचा संघ पाचव्या स्थानावर आहे. नीरज कुमारने पाटणाच्या बचावात चमकदार कामगिरी केली आणि त्याला ८ टॅकल पॉइंट मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यू मुम्बासाठी, अभिषेक सिंगने सर्वाधिक ८ रेडिंग गुण मिळवले, परंतु तो संघाला एकतर्फी पराभवापासून वाचवू शकला नाही. पाटणा पायरेट्ससाठी नीरजशिवाय मोहम्मदराझानेही बचावात हाय-५ पूर्ण केला. सचिन आणि कर्णधार प्रशांत कुमार राय यांनी चढाईत प्रत्येकी ७ गुण घेतले.

दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सने तेलुगू टायटन्सविरुद्ध सोपा विजय नोंदवला. राकेश सुंगरोयाने केलेल्या दमदार आक्रमणामुळे गुजरातने तेलुगू टायटन्सला ४०-२२ असे हरवले. गुजरात जायंट्सचा आठ सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे आणि त्याव्यतिरिक्त त्यांचे दोन सामने बरोबरीत सुटले आहेत, तर तेलुगू टायटन्स संघाने आठ पैकी सहा सामने गमावले आहेत आणि त्यांचे दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. गुजरातच्या राकेशने १६ रेडिंग गुण मिळवले.

हेही वाचा – सचिनची होणार BCCIमध्ये एन्ट्री..! जय शाह​ यांनी दिले संकेत; म्हणाले….

पहिल्या सत्रातनंतर गुजरात जायंट्सने २०-१३ अशी चांगली आघाडी घेतली. पहिल्या १०-१२ मिनिटांत सामना जवळपास बरोबरीत होता, पण गुजरात जायंट्सने १३व्या मिनिटाला तेलुगू टायटन्सला ऑलआऊट करत आघाडी घेतली आणि तिथून टायटन्स पिछाडीवर पडला. उत्तरार्धात रजनीशने सुपर १० पूर्ण करत सामन्यात १२ गुण मिळवले, पण तो तेलुगू टायटन्सला एकतर्फी पराभवापासून वाचू शकला नाही. रजनीशशिवाय तेलुगू टायटन्सच्या एकाही खेळाडूला ५ गुण घेता आले नाहीत आणि हेच त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pkl 2021 22 patna pirates vs u mumba and telugu titans vs gujarat giants report adn
First published on: 11-01-2022 at 22:03 IST