scorecardresearch

IPL All Time XIमध्ये धोनीला कर्णधार करण्यावर प्रज्ञान ओझाने उपस्थित केला प्रश्न; म्हणाला, ‘धोनीपेक्षा रोहित…’

IPL All Time XI: ख्रिस गेल, अनिल कुंबळे, सुरेश रैना यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी आयपीएल ऑल टाइम इलेव्हनची निवड केली आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनीला कर्णधार बनवण्यात आले, मात्र त्यावर प्रज्ञान ओझाने आक्षेप घेतला.

MS Dhoni the captain of IPL All Time XI
एमएस धोनी आणि रोहित शर्मा (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

ख्रिस गेल, सुरेश रैना, स्कॉट स्टायरिस, पार्थिव पटेल, रॉबिन उथप्पा आणि इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) भाग असलेले अनिल कुंबळे यांनी एकत्रितपणे आयपीएल ऑल-टाइम इलेव्हन निवडली आहे. या सगळ्यांनी मिळून या स्पेशल इलेव्हनचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीकडे सोपवले. त्याचबरोबर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचाही या ११ खेळाडूंच्या विशेष यादीत समावेश आहे.

जिओ सिनेमावरील लीजेंड्स लाउंजमध्ये या विशिष्ट इलेव्हनची निवड करण्यात आली. त्यानंतर त्यावर चर्चा ही झाली. ज्यामध्ये प्रग्यान ओझा, रॉबिन उथप्पा, सुरेश रैना, पार्थिव पटेल, आरपी सिंग आणि आकाश चोप्रा यावेळी या चर्चेचा भाग बनले. त्यांनी एकत्र आयपीएल ऑल टाइम इलेव्हनवर चर्चा केली.

या चर्चेदरम्यान प्रग्यान ओझाने धोनीकडे कर्णधारपद सोपवण्यावर प्रश्न उपस्थित केला. तसेच तो म्हणाला, ”या दोघांची (धोनी आणि रोहित) तुलना करायची झाली तर दोघेही खूप समान आहेत. दोघांकडे गोलंदाजांचे कर्णधार आहेत. मी फक्त जिंकलेल्या विजेतेपदांची तुलना करत आहे, रोहित शर्माकडे महेंद्रसिंग धोनीपेक्षा जास्त खिताब आहेत. तुम्ही ऑल टाईम इलेव्हनबद्दल बोलत आहात. १५ वर्षात पाच विजेतेपदे जिंकणे ही काही साधी कामगिरी नाही.”

हेही वाचा – Women U19 WC 2023: उपांत्य फेरीत भारत- न्यूझीलंड आमनेसामने कोण मारणार बाजी? चाहत्यांच्या हृदयाचे ठोके पुन्हा वाढणार

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच तर चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्वाखाली चार विजेतेपदे जिंकली आहेत. रैना मात्र धोनीच्या कर्णधारपदावर ठाम राहिला आणि म्हणाला, “त्याने खूप सकारात्मकता आणली आणि तो जगातील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक आहे.” कोणत्याही खेळाडूकडून सर्वोत्तम कामगिरी करुन घेणे, हे एमएस धोनीचे कौशल्य आहे, जर धोनीने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक विजेतेपद जिंकले नसते, तर कदाचित आयपीएल २००८ मध्ये जशी सुरू झाली, तशी झाली नसती.”

आयपीएल ऑल टाईम इलेव्हन: रोहित शर्मा, ख्रिस गेल, विराट कोहली, केएल राहुल, एबी डिव्हिलियर्स, एमएस धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा,

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 14:21 IST