प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने तेलुगू टायटन्सचा दोन गुणांनी पराभव केला. हरियाणाने हा सामना ३९-३७ असा जिंकला. या हंगामातील हरियाणाचा हा पहिलाच विजय आहे. त्याचबरोबर तेलुगू टायटन्सला आतापर्यंत तीन सामन्यांत एकही विजय मिळालेला नाही.

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या दिवशी म्हणजेच आज दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात पाटणा पायरेट्सने पुणेरी पलटणचा ३८-२६ असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने तेलुगू टायटन्सचा ३९-३७ असा पराभव केला. दोन्ही सामने बेंगळुरूच्या शर्टन मैदानावर व्हाईटफिल्डवर खेळले गेले.

Pro Kabaddi League 2021 : पाटणा पायरेट्सचा दमदार खेळ, पुणेरी पलटणचा १२ गुणांनी पराभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या हंगामासाठी एकूण १२ संघ मैदानात उतरलेले आहेत. गेल्या वर्षी करोना महामारीमुळे ही लीग आयोजित करता आली नव्हती. अशा परिस्थितीत चाहते या रोमांचक लीगची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते.