भारतीय क्रिकेट संघाला तीनही आयसीसी चषक जिंकवून देणारा महेंद्रसिंह धोनी हा जगातल्या सर्वात महान कर्णधारांपैकी एक आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक, आयसीसी टी-२० विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी झेपावला. धोनीच्या नेतृत्वात बरीच वर्ष खेळणाऱ्या रवीचंद्रन अश्विनने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अश्विन म्हणाला, धोनीच्या निवृत्तीनंतर टीम खूप बदलली आहे.

भारतीय संघाने पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. हा संघ आता दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. भारतीय संघाने सलग दोनदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात नमवलं आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भिडतील.

हे ही वाचा >> सोशल मीडियावर ट्रोल झाला पण मैदान गाजवलं, नवीन उल हकने रोहितसह सूर्या-ग्रीनचा झंझावात थांबवला, Video झाला व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बीसीसीआयने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अश्विन टीम इंडियाच्या यशाबद्दल बोलतोय. अश्विन म्हणाला २०१४-१५ नंतर संघात मोठा बदल दिसून आला आहे. तेव्हा नुकतीच धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्या संघाकडे २० कसोटी सामन्यांचा अनुभव होता आणि त्यानंतर संघाने जे केलं ते वरिष्ठ खेळाडूंशिवाय शक्य झालं नसतं. या संघाने चांगली कामगिरी केली आणि त्यामुळेच हा संघ सलग दुसऱ्यांदा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत आहे.