Rahul Dravid appointed head coach of Rajasthan Royals for IPL 2025 : आयपीएल २०२५ साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. यावेळी स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. मात्र, लिलावाच्या नियमांबाबत आयपीएलकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, आयपीएलच्या एका संघाने राहुल द्रविडला आपल्या संघाचा भाग बनवले आहे. या टीमने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. हा संघ दुसरा कोणी नसून राजस्थान रॉयल्स आहे.

१६ वर्षांचा दुष्काळ संपणार का?

तो बऱ्याच काळानंतर राजस्थान रॉयल्समध्ये परतला आहे. राहुल द्रविड एकेकाळी राजस्थान रॉयल्सचा कर्णधारही होता. राजस्थान रॉयल्सने राहुल द्रविडला आपल्या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे, परंतु यावेळी त्यांच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न असेल की ते यावेळी ट्रॉफीसाठी १६ वर्षांची प्रतीक्षा संपवू शकतील की नाही. राहुल द्रविड काही महिन्यांपूर्वी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता. त्याच्या कोचिंगखाली भारतीय संघाने यंदाच्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा अनुभव अप्रतिम आहे. भारतीय संघाव्यतिरिक्त, त्याने भारतीय अंडर-19 संघ, राजस्थान रॉयल्स, दिल्ली डेअरडेव्हिल्सचे मार्गदर्शक आणि एसीए प्रमुख म्हणून काम केले आहे.

राहुल द्रविड म्हणाला काय म्हणाला?

सोशल मीडियावर राहुल द्रविडबद्दल अपडेट देताना, राजस्थान रॉयल्सने लिहिले की, भारताचा विश्वचषक विजेता प्रशिक्षक राहुल द्रविड राजस्थान रॉयल्समध्ये परतण्यास तयार आहे! क्रिकेट आयकॉन राहुल द्रविडला रॉयल्स स्पोर्ट्स ग्रुपचे सीईओ जेक लश मॅक्रेम यांच्याकडून गुलाबी जर्सी घेताना दिसले.

हेही वाचा – ENG vs SL : शूज साईज १५ असलेल्या वेगवान गोलंदाजाचं इंग्लंडसाठी कसोटी पदार्पण, जाणून घ्या कोण आहे ‘तो’?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाल्यानंतर द्रविड म्हणाला की, विश्वचषकानंतर मला वाटते की माझ्यासाठी आणखी एक आव्हान स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी राजस्थान रॉयल्स हा सर्वोत्तम संघ आहे. राजस्थान रॉयल्सने संघात त्याची भूमिका काय असेल याबाबत कोणतीही माहिती दिली नसली तरी ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार त्याला मुख्य प्रशिक्षक म्हणून संघात संधी दिली जाणार आहे.