भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड पदावरून पायउतार झाले आहेत. यादरम्यानच द्रविड यांनी बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकपसाठी बक्षीस म्हणून दिलेली अतिरिक्त रकमेतील निम्मी रक्कम न घेण्यचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने टी-२० विश्वचषक विजेत्या संघासाठी १२५ कोटींची बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. यापैकी ५ कोटी रपये हे खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक यांना दिले जाणार आहेत. पण या ५ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेपैकी निम्मी रक्कम द्रविड घेणार नसल्याचा रिपोर्ट समोर आला आहे. पण यामागचं नेमकं कारण काय आहे, जाणून घेऊया.

हेही वाचा – IND vs ZIM मधील तिसरा टी-२० सामना कुठे लाइव्ह पाहता येणार? जिओ, हॉटस्टर नाही तर…

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयानंतर संघ, कोचिंग स्टाफ आणि सपोर्ट स्टाफला एकूण १२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले. संघातील खेळाडूंच्या बरोबरीने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ५ कोटी रुपये देण्याचीही चर्चा होती, तर संघाच्या इतर प्रशिक्षकांना अडीच कोटी रुपये देण्यात येणार होते.

हेही वाचा – मेस्सीच्या कुशीत असलेलं हे लहान बाळ घडवतंय इतिहास, स्पेनचा १६ वर्षीय लामिने यामल आणि दिग्गज मेस्सीचा फोटो व्हायरल

पण द्रविड यांनी बोर्डाला त्यांच्या बक्षीसाची रक्कम २.५ कोटी रुपये कमी करण्यास सांगितले. या मागचे कारण खूप खास आहे, ते म्हणजे राहुल द्रविड यांना त्याच्या कोचिंग स्टाफच्या बक्षीस रकमेपेक्षा अधिक रक्कम घ्यायची नाही. अहवालानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले- राहुलला त्याच्या उर्वरित सपोर्ट स्टाफ (गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर) प्रमाणेच बोनस रक्कम (२.५ कोटी रुपये) मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो.

हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१८ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविड यांनी नेमकं हेच केलं होतं. त्यावेळी द्रविडला ५० लाख रुपये, तर सपोर्ट स्टाफच्या इतर सदस्यांना प्रत्येकी २० लाख रुपये मिळणार होते. खेळाडूंना प्रत्येकी ३० लाख रुपये मिळणार होते, पण द्रविडने बक्षीस रकमेचे असे विभाजन करण्यास नकार दिला आणि त्यामुळे बीसीसीआयला प्रत्येकाला समान रक्कम देण्यास भाग पाडले. त्यानंतर बोर्डाने रोख पुरस्कारांची सुधारित यादी जारी केली, ज्यामध्ये द्रविडसह सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला २५ लाख रुपये मिळाले.