Ranji Trophy Quarterfinal Mumbai Squad vs Haryana: रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी मुंबईने आपला संघ जाहीर केला आहे. गट सामन्यासाठी भारतीय संघाचे खेळाडू संघाचा भाग होते. पण आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर हे खेळाडू भारतीय संघात सामील झाले आहेत. दरम्यान इंग्लंडविरूद्धची टी-२० मालिका संपल्यानंतर या मालिकेतील खेळाडू रणजी संघात सामील झाले आहेत.

मोठी बातमी म्हणजे सूर्यकुमार यादवचा संघात प्रवेश झाला असून श्रेयस अय्यरच्या जागी त्याची निवड करण्यात आली आहे. मुंबईचा संघ हरियाणाविरुद्ध रणजी ट्रॉफीची उपांत्यपूर्व फेरी खेळणार आहे. हा सामना लाहली क्रिकेट मैदानावर होणार आहे. तर अष्टपैलू शिवम दुबेचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यापूर्वी पृथ्वी शॉचीही मुंबई संघात निवड झालेली नाही. मुंबईने १८ सदस्यीय संघ निवडला असून त्यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे, त्यामुळे तो मुंबई संघात नाही.

रणजी ट्रॉफीच्या या मोसमात मुंबईची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. त्यांनी फक्त एकच सामना गमावला आहे. हा पराभव त्यांना जम्मू-काश्मीर संघाविरूद्ध मिळाला. याशिवाय मुंबईने बडोद्याचा ८४ धावांनी पराभव केला. या संघाने महाराष्ट्रावर ९ गडी राखून विजय मिळवला. त्रिपुराविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला पण त्यानंतर संघाने ओडिशाचा एक डाव आणि १०३ धावांनी पराभव केला. मुंबई संघाने सर्व्हिसेसविरुद्धचा सामना ९ गडी राखून जिंकला. तर मुंबई संघाने मेघालयवर एक डाव आणि ४५६ धावांनी मोठा विजय मिळवलत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्वी सामन्यासाठी मुंबईचा संघ

अजिंक्य रहाणे, आयुष म्हात्रे, अंगकृष्ण रघुवंशी, अमोघ भटकळ, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, सुर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉस्टन डायस, अथर्व अंकोलेकर आणि हर्ष तन्ना.