भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विन मैदानावर आणि मैदानाबाहेर नेहमीच चर्चेत असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर गावसकर मालिका नुकतीच संपली आहे. अश्विनला बॉर्डर गावसकर मालिकेतील अद्वितीय कामगिरीबद्दल मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. मालिका संपली तरी अश्विन मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी कायम आहे. त्याला कारण आहे अश्विनचा सोशल मीडियावरील वावर.

अश्विन सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. तो ट्विटरवर नेहमीच गंमतीशीर ट्वीट्स करून लोकांचं लक्ष वेधून घेतो. नुकतीच त्याने ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. खरंतर अश्विनला त्याच्या ट्विटर अकाऊंटच्या सुरक्षेबाबत थोडी भिती आहे. त्यामुळेच त्याने मस्क यांच्याकडे मदत मागितली आहे. यासंदर्भात अश्विनने बुधवारी एक ट्वीट केलं.

खरंतर मस्क यांनी ट्विटर टेकओव्हर केल्यानंतर या मायक्रोब्लॉगिंग साईटमध्ये अनेक बदल झाले आहेत. याचदरम्यान, युजर्सच्या काही अडचणी वाढल्या आहेत. तुमचं ट्विटर अकाऊंट व्हेरीफाय असेल म्हणजेच तुमच्या अकाउंटला ब्लू टिक असेल तरच ट्विटरची टू फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रणाली काम करते.

हे ही वाचा >> “तुमच्या-माझ्यात फक्त एवढाच फरक, तुम्ही स्वभावाने…” देवेंद्र फडणवीसांच्या वाक्यावर अजितदादांची खळखळून दाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्विनचं मस्क यांच्याकडे गाऱ्हाण

अश्विनला त्याच्या ट्विटरवर काही पॉप अप्स पाहायला मिळाले आहे. यावरून तो थोडा गोंधळला आहे. त्यामुळे त्याने थेट एलॉन मस्क यांना टॅग करून विचारलं की, “ठिक आहे! मी आता १९ मार्चआधी माझं ट्विटर अकाउंट कसं सुरक्षित करू शकतो. मला सतत पॉप अप्स येत आहेत. परंतु मला कोणत्याही लिंकवर जाऊन स्पष्ट माहिती मिळत नाहीये. एलॉन मस्क तुम्ही आवश्यक गोष्टी करा आणि आम्हाला योग्य दिशेने घेऊ जा.”