R Ashwin became the 14th player to play 100 Tests : भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने धर्मशाला कसोटीत मैदानात उतरताच इतिहास रचला. तो भारताकडून १००वी कसोटी खेळणारा १४वा खेळाडू ठरला. त्याच्याआधी तेरा खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे. त्याची १००वी कसोटी संस्मरणीय करण्यासाठी त्याला धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खास पद्धतीने टेस्ट कॅप देण्यात आली. या खास खास क्षणी अश्विनची पत्नी प्रीती आणि त्याच्या दोन मुलीही स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. यावेळी भारतीय संघाने अश्विनला गार्ड ऑफ ऑनरही दिला.

भारतीय खेळाडू स्टेडियममध्ये एका रांगेत उभे होते. समोर, अश्विनची १०० वी कसोटी कॅप स्मृतीचिन्ह ठेवल्याप्रमाणे एका खास पद्धतीने पॅक करून ठेवली होती. यानंतर पत्नी आणि मुलींना बोलावून ते अश्विनच्या जवळ उभे राहिले. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अश्विनबद्दल काही शब्द व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी अश्विनकडे १००वी टेस्ट कॅप दिली. यावेळी भारतीय खेळाडू टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. यावेळी अश्विनची प्रीती भावूक दिसत होती. सर्व खेळाडूंनी अश्विनला मिठी मारून अभिनंदन केले. भारतीय खेळाडूंनी त्यांना गार्ड ऑफ ऑनरही दिला. बीसीसीआयने याबाबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

Virat Kohli creates unique record
SRH vs RCB : विराट कोहलीने केला अनोखा विक्रम, IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
Dinesh Karthik makes history against KKR Match
KKR vs RCB : ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने रचला इतिहास, IPL मध्ये ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला तिसरा खेळाडू
Dipendra Singh Airee Sixes Video
Dipendra Singh Airee : ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत नेपाळच्या फलंदाजाने कतारच्या गोलंदाजाला फोडला घाम, पाहा VIDEO
MS Dhoni 300 Dismissals in T20
DC vs CSK : महेंद्रसिंग धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला यष्टीरक्षक

अश्विनसाठी ही मालिका सोपी राहिलेली नाही. राजकोटमधील मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ५०० कसोटी विकेट्स पूर्ण केल्यानंतर अश्विनला अचानक घरी परतावे लागले. त्यानंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अश्विनची आई आजारी असल्याचे सांगितले होते. मात्र, एका दिवसाच्या अंतरानंतर अश्विनने त्या कसोटीत पुनरागमन केले आणि त्यानंतर ५०१वी विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs ENG 5th Test : १०० वा कसोटी खेळणाऱ्या अश्विन-बेअरस्टो जोडीने रचला इतिहास, २०१३ नंतर प्रथमच ‘असे’ घडले

अश्विनच्या अगोदर कोणत्या खेळाडूंनी खेळलाय शंभरवा सामना?

रविचंद्रन अश्विनपूर्वी सचिन तेंडुलकर (२००), राहुल द्रविड (१६३), व्हीव्हीएस लक्ष्मण (१३४), अनिल कुंबळे (१३२), कपिल देव (१३१), सुनील गावसकर (१२५), दिलीप वेंगसरकर (११६), सौरव गांगुली (११३), विराट कोहली (११३), इशांत शर्मा (१०५), हरभजन सिंग, चेतेश्वर पुजारा (१०३) आणि वीरेंद्र सेहवाग (१०३) यांनी ही कामगिरी केली आहे.

दुसऱ्यांदा विरोधी संघातील दोन खेळाडूंची शंभरवी कसोटी –

पर्थ येथे २०१३ च्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ॲशेस सामन्यात, इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यांनी त्यांचा १०० वा कसोटी सामना एकत्र खेळला होता. अश्विन आणि बेअरस्टो हे गुरुवारी भारत विरुद्ध इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात आपापल्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि यादीत चौथ्या स्थानावर आहेत. तथापि, कूक-क्लार्कनंतर ही दुसरी वेळ आहे की एकाच सामन्यात विरोधी संघातील दोन खेळाडू त्यांची १०० वी कसोटी खेळत आहेत.