Ravichandran Ashwin opted out : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी (१६ फेब्रुवारी) इंग्लंडच्या पहिल्या डावात रविचंद्रन अश्विनने जॅक क्रॉलीला बाद करत मोठा पराक्रम केला. आज कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या कारकिर्दीतील ५०० वी विकेट घेतली. हा पल्ला गाठणारा तो जगातील नववा आणि दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. मात्र रविचंद्रन अश्विनला तिसऱ्या कसोटीतून अचानक माघार घ्यावी लागली आहे. अश्विनच्या बाहेर जाण्यामुळे भारतला एक मोठा झटका बसला आहे.

बीसीसीआयने सोशल मीडियावर दिली माहिती

तिसऱ्या कसोटीत भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत असताना सर्वबाद ४४५ धावा केल्या. त्यात अश्विनने ३७ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. त्यानंतर गोलंदाजीला सुरुवात झाल्यानंतर त्यानेच भारताला जॅक क्रॉलीच्या रुपात पहिले यश मिळवून दिले होते. मात्र रविचंद्रन अश्विनच्या कुटुंबात अचानक अडचण निर्माण झाल्यामुळे त्याला सामन्यात मधूनच बाहेर पडावे लागत आहे. बीसीसीआयने आपल्या एक्स अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली.

IND vs ENG : “त्यांच्यामुळे आयुष्यात सर्व काही…”, अश्विनने ५००वी कसोटी विकेट कोणाला समर्पित केली?

आम्ही अश्विनच्या कुटुंबियांबरोबर

बीसीसीआयने आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, या कठीण परिस्थितीमध्ये भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि संघातील सर्व खेळाडू, सहकारी कर्मचारी रविचंद्रन अश्विनच्या पाठिशी आहेत. खेळाडूंच्या कुटुंबियांना आम्ही पाठिंबा देतो आणि त्यांचे आरोग्य आणि खुशाली आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. या आव्हानात्मक परिस्थितीतून अश्विन आणि कुटुंबिय बाहेर पडतील, अशी आशा करुयात, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बीसीसीआयच्या संकेतस्थळावर दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज रविचंद्रन अश्विन कसोटीत ५०० विकेट्स घेणारा नववा गोलंदाज ठरला. कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. मुथय्या मुरलीधरनच्या नावावर ८०० कसोटी विकेट्स आहेत. यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज शेन वॉर्न दुसऱ्या स्थानावर आहे. शेन वॉर्नच्या नावावर १४५ कसोटी सामन्यांमध्ये ७०८ विकेट्स आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जिमी अँडरसन तर चौथ्या क्रमांकावर भारतीय दिग्गज अनिल कुंबळे आहे. जिमी अँडरसन आणि अनिल कुंबळे यांच्या नावे अनुक्रमे ६९५ आणि ६१९ विकेट्स आहेत.