Ravindra Jadeja No 1. All Rounder In ICC Test Rankings: भारताचे सिनियर खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटीमधून निवृत्ती अचानक जाहीर केली. त्यामुळे सध्या हे दोन्ही खेळाडू चर्चेचा विषय ठरले आहेत. तर काही चाहते यादरम्यान म्हणतायत की रवींद्र जडेजाने तरी निवृत्ती जाहीर करू नये. यामागचं कारण म्हणजे भारताने टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर या तिन्ही खेळाडू एकामागून एक निवृत्ती जाहीर केली होती. पण ही चर्चा सुरू असतानाच रवींद्र जडेजाने कसोटीमध्ये इतिहास रचला आहे.
रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये असा इतिहास घडवला आहे जो यापूर्वी कधीही कोणत्याच खेळाडूला जमला नाही. आयसीसीने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या नव्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा पहिल्या स्थानावर आहे. जडेजा सर्वाधिक ४०० गुणांसह पहिल्या स्थानी आहे.
आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूच्या ताज्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजा अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. बऱ्याच काळापासून, जगातील कोणताही अष्टपैलू खेळाडू जडेजाकडून हा पहिल्या क्रमांकाचा ताज हिसकावून घेऊ शकलेला नाही. कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दीर्घकाळ पहिल्या स्थानावर राहणारा जडेजा आता जगातील पहिला खेळाडू बनला आहे.
जडेजा हा २०२२ पासून म्हणजेच ११५१ दिवसांपासून कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय बांगलादेशचा मेहदी हसन मिराज ३२७ रेटिंग गुणांसह यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. ९ मार्च २०२२ रोजी रवींद्र जडेजा वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकून जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी अष्टपैलू खेळाडू ठरला. तेव्हापासून ३८ महिने झाले आहेत, रवींद्र जडेजा ११५१ दिवसांनंतरही सतत पहिल्या क्रमांकावर आहे.
२०२२ मध्ये जेव्हा रवींद्र जडेजा जगातील नंबर वन टेस्ट अष्टपैलू खेळाडू बनण्याचा मान दुसऱ्यांदा पटकावला होता. कारण त्याआधी, तो ऑगस्ट २०१७ मध्ये एका आठवड्यासाठी पहिल्या क्रमांकावर कायम होता. ताज्या कसोटी अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी, रवींद्र जडेजाची स्पर्धा बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजशी होती, ज्याचे ३२७ रेटिंग गुण आहेत. नवीन क्रमवारीत, मेहदी हसनने मार्को यान्सनला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.
पॅट कमिन्स हा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. तर बांगलादेशचा शाकिब अल हसन पाचव्या स्थानावर आहे. जडेजा वगळता टॉप १० मध्ये दुसरा कोणताही भारतीय अष्टपैलू खेळाडू नाही. त्याच्यानंतर, अक्षर पटेल कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत १२ व्या क्रमांकावर आहे.