Ricky Ponting questioned England’s attacking mindset and style: ॲशेसच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडवर दमदार विजय मिळवला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने ४४ धावांची खेळी करत संघाला कठीण प्रसंगी सावरले आणि संघाला दोन विकेट्सने विजय मिळवून दिला. कमिन्सने नॅथन लायनसोबत ५५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या पराभवानंतर सामन्याच्या आस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने इंग्लड संघाच्या विचारसरणी आणि शैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू रिकी पाँटिंग म्हणाला, इंग्लंड संघालाला बेन स्टोक्सचा डाव घोषित करण्याचा निर्णय इंग्लंड महागात पडला. कदाचित त्याचा विजय आणि पराभवात फरक पडला. पाँटिंगने इंग्लंडच्या आक्रमक दृष्टिकोन आणि शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

रिकी पाँटिंग म्हणाला, “मला वाटते की इंग्लंडला त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. त्यांची खेळण्याची शैली, संपूर्ण अॅशेसमध्ये अशीच राहणार आहे का? त्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे असे मी अजिबात म्हणत नाही, मला त्यांना खेळताना पाहणे आवडते. पण, प्रत्येक सामना जिंकण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत हे दाखवून दिले.” तथापि, लॉर्ड्सच्या मैदानावर होणार्‍या अॅशेसच्या दुसर्‍या कसोटीसाठी एकही संघ आपली धारणा बदलेल असे पाँटिंगला वाटत नाही.

हेही वाचा – POR vs ICE: ख्रिस्तियानो रोनाल्डोने रचला इतिहास, ‘हा’ कारनामा करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले नाव

पाँटिंग पुढे म्हणाला, “हा एक मोठा आणि कठीण फॉर्मेट आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या पद्धती अधिक चांगल्या असल्याचे सिद्ध झाले आहे. मला वाटते मालिका अशाच प्रकारे खेळली जावी आणि मला माहित आहे की स्टोक्स आणि ब्रेंडन मॅक्युलम असेच खेळतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्याबद्दल बोलायचे तर, इंग्लंडने आपला पहिला डाव ८ बाद ३९३ धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात ३८६ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात २७३ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर २८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने सामना जिंकला. दोघांनी नवव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.