‘‘मेरा तो नाम बदनाम हुआ. इससे पुरे देश पे काला धब्बा लग गया हैं. चाहे मुझे फासी हो जाए, मैं इस की छानबिन करूंगा. दिन रात एक कर दुंगा,’’  असे उद्वेगजनक उद्गार भारताचा मल्ल नरसिंग यादवने बंदी घातल्यावर काढले. क्रीडा लवादाने नरसिंगबाबत निर्णय दिल्यावर साऱ्यांनाच धक्का बसला होता, तर नरसिंगचे भानच हरवले होते. या निर्णयाचा एवढा मोठा आघात नरसिंगवर झाला की बेशुद्धच पडला होता. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी हा खुलासा केला.

‘‘क्रीडा लवादाचा निर्णय ऐकल्यावर नरसिंग बेशुद्ध झाला होता. आता त्याची प्रकृती ठीक आहे. आम्ही कोणावरही कसलेच आरोप करणार नाही. या प्रकरणाची कसून चौकशी व्हायला हवी. पण आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे,’’ असे ब्रिजभूषण यांनी सांगितले.

या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी मी पंतप्रधानांकडे करणार आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवे. यासाठी सीबीआयची मदत लागली तर ती घ्यायला हवी. जर मी दोषी आढळलो तर मला फासावर लटकवा, मी त्यासाठी तयार आहे. माझी आणि या प्रकरणातील संबंधितांची नार्को चाचणी करायला हवी. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी.

नरसिंग यादव