scorecardresearch

Premium

Rishabh Pant: अपघातानंतर ऋषभचे मैदानावर पुनरागमन होताच टाळ्यांचा कडकडाट, फलंदाजीचा करतानाचा VIDEO व्हायरल

Rishabh Pant Batting Video : कार अपघातात गंभीर जखमी झालेला ऋषभ पंत आता झपाट्याने दुखापतीतून सावरत आहे. आता त्याचा फलंदाजी करतानाचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो जोरदार फटकेबाजी करताना दिसत आहे.

Rishabh Pant's return to the field after the accident
ऋषभ पंत (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Rishabh Pant’s return to the field after the accident: अखेर, ज्या दिवसाची क्रिकेट चाहत्य खूप दिवसांपासून वाट पाहत होते, तो दिवस बुधवारी आला, १५ ऑगस्ट २०२३, जेव्हा कार अपघातानंतर ऋषभ पंत पहिल्यांदा क्रिकेट खेळला. ऋषभ पंतच्या फलंदाजीचा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये, धडाकेबाज डावखुरा फलंदाज त्याचा ट्रेडमार्क शॉट मारताना दिसत आहे.

ऋषभ पंतने एक शॉट इतक्या जोरात मारला की, चेंडू मैदानाच्या बाहेर गेला. दिल्ली कॅपिटल्सने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘व्हिडीओची गुणवत्ता 144P असू शकते, परंतु आमच्या डोळ्यातील भावना 1080p आहेत. ऋषभ पंतने स्वातंत्र्यदिन मैदानावर घालवला आणि ते स्वप्नासारखे वाटले. दिल्ली कॅपिटल्सने या व्हिडीओचे श्रेय इसराक अहमद/प्रियांशुमिश्राला दिले आहे.

Pope and Bumrah Controversy in Ind vs ENG 1st Test Match
IND vs ENG : जसप्रीत बुमराहने ऑली पोपशी मुद्दाम पंगा घेतल्याने रोहितला करावी लागली मध्यस्थी, VIDEO होतोय व्हायरल
Video of umpire in Sindh Premier League goes viral
SPL 2024 : अंपायरने अपील न होताच फलंदाजाला केले बाद घोषित, पाकिस्तानमधील सामन्यातील VIDEO होतोय व्हायरल
Shreyas Iyer has injured his hand ahead India vs England Test series
IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारताची वाढली चिंता, सराव सत्रात श्रेयस अय्यरला झाली दुखापत
Shoaib Malik is throwing three no balls in bangladesh premier league
Shoaib Malik : ‘लग्न असो किंवा नो-बॉल, तो प्रत्येक काम तीनदा…’, शोएब मलिक सोशल मीडियावर होतोय ट्रोल

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत डिसेंबर २०२२ मध्ये एका गंभीर कार अपघातात जखमी झाला होता. तेव्हापासून तो क्रिकेटपासून लांब होता. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जेएसडब्ल्यू विजयनगर येथे सराव सामन्यादरम्यान ऋषभ पंत फलंदाजी करताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Ben Stokes: मोईन अलीकडून प्रेरित होऊन बेन स्टोक्सने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे, ‘या’ ट्विटद्वारे झाला खुलासा

ऋषभ पंत फलंदाजीला आला तेव्हा मोठी गर्दी होती. त्याचे क्रिझवर आगमन होताच टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. ऋषभ पंतनेही लाँग ऑफच्या दिशेने उंच फटके मारले. त्याच्या शॉटला मैदानावरील चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या वर्षाच्या सुरुवातीला ऋषभ पंतवर लिगामेंटची शस्त्रक्रिया झाली होती.

ऋषभ पंत बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅब प्रक्रियेतून जात आहे. २१ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या बीसीसीआयच्या निवेदनानुसार, भारतीय स्टारने फलंदाजीबरोबरच किपिंगही सुरू केली आहे. मात्र, पहिल्यांदाच ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात परतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

हेही वाचा – Prithvi Shaw Knee Injury : पृथ्वी शॉच्या झंझावाती फलंदाजी लागला ब्रेक, दुखापतीमुळे कौंटी क्रिकेट स्पर्धेतून पडला बाहेर

पंतच्या दुखापतीनंतर इशान किशनने सांभाळली त्याची जबाबदारी –

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर, त्याच्या जागी, केएस भरतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली, परंतु त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे न झाल्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याच्या इशान किशनला संधी देण्यात आला. त्याचबरोबर इशान किशन आणि संजू सॅमसन मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये ही जबाबदारी पार पाडताना दिसले आहेत. मात्र, एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून इशान किशनचा वरचष्मा मानला जातो, त्यामागे त्याचा अलीकडचा फॉर्म हेही मोठे कारण आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rishabh pant making a comeback batting on the field after the accident went video viral vbm

First published on: 16-08-2023 at 20:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×