Rishabh Pant Updates His Social Media Account: टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात जखमी झाला होता. या अपघातात त्याचा जीव थोडक्यात बचावला. यामुळे तो मैदानापासून दूर आहे. तो सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) रिहॅब करत आहे. दरम्यान, त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरमध्ये मोठा बदल केला आहे. त्याने त्याच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवर दुसरी जन्मतारीख (डेथ ऑफ बर्थ) जोडली आहे. त्यानी दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या बायोवर लिहिले आहे, “सेकंड डेट ऑफ बर्थ ५ जानेवारी २०२३.”

३० डिसेंबर २०२२ रोजी ऋषभ पंतच्या कारचा अपघात झाला होता. तो दिल्लीहून रुरकीला कारमधून एकटाच घरी जात होता. त्याला त्याच्या आईला नवीन वर्षाचं सरप्राईज द्यायचं होतं. त्याची खरी जन्मतारीख ४ ऑक्टोबर १९९७ आहे. २५ वर्षीय स्टार क्रिकेटरला डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमधून ५ जानेवारी रोजी मुंबईला विमानाने हलवण्याच आले होते. जिथे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

ऋषभ पंत शस्त्रक्रियेनंतर एनसीएमध्ये रिहॅब करत आहे –

ऋषभ पंतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर का सेकंड बर्थ डेट अपडेट केली

शस्त्रक्रिया झाल्यापासून ऋषभ पंत एनसीएमध्ये पुनर्वसन करत आहे. अलीकडेच त्याने सोशल मीडियावर केएल राहुल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्याने कॅप्शन दिले, “पुनर्मिलन नेहमीच मजेदार असते.” आयएएनएसएलला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता, “मी आता खूप बरा आहे आणि बरा होत आहे. आशा आहे की, देवाच्या कृपेने आणि वैद्यकीय पथकाच्या पाठिंब्याने मी लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होईल.”

हेही वाचा – AUS vs ENG: लॉर्डस कसोटीत नॅथन लायनने रचला इतिहास! ऑस्ट्रेलियासाठी ‘हा’ कारनामा करणारा ठरला तिसरा खेळाडू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार अपघातानंतर ऋषभ पंत काय म्हणाला?

ऋषभ पंत म्हणाला, “आता मी माझ्या आयुष्याकडे नव्या दृष्टीकोनातून पाहतो. आज मी ज्याला महत्त्व देतो, ते म्हणजे माझ्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घेणे. त्यात त्या छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश होतो, ज्याकडे आपण आपल्या दैनंदिन जीवनात दुर्लक्ष करतो. आज प्रत्येकजण काहीतरी विशेष मिळवण्यासाठी खूप मेहनत घेत असतो, पण रोज आनंद देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला आपण विसरलो आहोत.”