scorecardresearch

Premium

IND vs AUS, World Cup: विश्वचषक मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी कॅप्टन रोहित झाला भावूक; म्हणाला, “भारतीय खेळाडू होणे सोपे…”

IND vs AUS, World Cup: विश्वचषक २०२३मध्ये भारताच्या मोहिमेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापासून आज सुरुवात झाली. या सामन्याआधी पत्रकार परिषदेत रोहित शर्मा भावूक झाला.

Captain Rohit gets emotional before starting World Cup campaign Said Being an Indian player is not easy
रोहित शर्माने म्हटले आहे की, “भारतीय खेळाडू होणे सोपे नाही. चाहत्यांच्या अपेक्षा खूप दडपण निर्माण करतात.” सौजन्य- (ट्वीटर)

IND vs AUS, World Cup: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया आपल्या विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात करू इच्छित आहे. भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकली होती. अशा परिस्थितीत आयसीसी ट्रॉफीचा दशकभराचा दुष्काळ संपवण्याची जबाबदारी रोहित शर्माच्या संघावर आहे. या स्पर्धेतील पहिला सामना खेळण्यापूर्वी रोहित शर्माने म्हटले आहे की, “भारतीय खेळाडू होणे सोपे नाही. चाहत्यांच्या अपेक्षा खूप दडपण निर्माण करतात.” याबरोबरच त्याने असेही सांगितले की, “त्याच्या संघात मॅच विनर्स आहेत ज्यांना दबावाच्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे हे माहित आहे.”

रोहित पुढे म्हणाला, “आम्ही भारतीय क्रिकेटपटू आहोत. आम्हाला दबावाच्या परिस्थितीतून जावे लागते. मला या संघात अनेक मानसिकदृष्ट्या मजबूत असे खेळाडू दिसत आहेत, जे त्यांच्या कारकिर्दीत अडचणीतून गेले आहेत. त्यांच्यापैकी कोणीही इतक्या सहज हा पल्ला गाठू शकला नाही. ते सगळे एका वाईट काळातून गेले आहेत. त्यांनी त्यांचा कठीण काळ सहन केला आहे आणि आज त्यांनी जे काही मिळवले, ते त्यांच्या मेहनत, श्रम आणि कष्टाच्या बळावर कमवले.”

England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
Umpire stops Australia Wicket celebrations no appeal For run out Rule For Not Out AUS vs WI T20I Highlights Second Win After IND vs AUS
ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन पंचांनी थांबवलं; बाद असूनही ‘त्याला’ घोषित केलं नाबाद, क्रिकेटचा हा नियम काय सांगतो?
Indian u 19 cricket team skipper uday saharan
U19 WC Final : “आमची तयारी चांगली होती, पण..”, पराभवानंतर कर्णधार उदय सहारनची प्रतिक्रिया
U19 World Cup 2024 Updates in marathi
U19 WC 2024 final: भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार अंतिम सामना? टीम इंडियाला मिळणार १८ वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची संधी

भारताचा कर्णधार पुढे म्हणाला, “१६ वर्षाच्या या कारकिर्दीत मला या कठीण प्रसंगातून कसे जायचे हे शिकवले. अनुभव खूप काही शिकवतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मोठ्या जोखमीच्या खेळात दबावाला सामोरे जाणे. १६ वर्षांच्या क्रिकेटने मला चांगल्या-वाईट क्षणांना कसे सामोरे जावे हे समजावले. संघातील सहकाऱ्यांची साथ आणि कुटंबाची मदत यामुळे मी हे सर्व करू शकलो.”

हेही वाचा: IND vs AUS Live Score, WC 2023: विराट कोहली-के.एल. राहुल यांची शानदार अर्धशतके! टीम इंडियाने मजबूत स्थितीत

हिटमॅन म्हणाला की, “रोहितला समजले आहे की दबाव हाताळणे हे एक अद्वितीय कौशल्य आहे आणि प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने यावर मत देईल. मला खात्री आहे की स्पर्धेच्या काही टप्प्यांवर काही खेळाडू दडपणातून जातील, संघ दबाव झेलून चांगली कामगिरी करेल. पण इथेच आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत खेळाडूंची गरज आहे.”

सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात काय झाले?

ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध ४९.३ षटकांत १९९ धावांत गारद झाला. हा सामना जिंकण्यासाठी भारताला ३०० चेंडूत केवळ २०० धावा करायच्या आहेत. मात्र, खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नाही. अशा स्थितीत भारताला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४६ धावा केल्या. वॉर्नरनेही ४१ धावांची खेळी खेळली. अखेरीस स्टार्कने २८ धावांचे योगदान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

हेही वाचा: IND vs AUS, World Cup: टीम इंडिया विश्वचषकात अडचणीत! शुबमन गिल पुढील सामन्यातूनही बाहेर होण्याची शक्यता, जाणून घ्या

लोकेश राहुलने ७२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील १६वे अर्धशतक आहे. त्याने विराट कोहलीबरोबर शानदार भागीदारी करत टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन केले आहे. आता मोठा डाव खेळून टीम इंडियाला विजय मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. ३० षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात १२० धावा आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit sharma captain rohit became emotional before starting the world cup campaign said it is not easy to be an indian player avw

First published on: 08-10-2023 at 21:14 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×