IND vs AUS Mark Waugh Says Rohit Sharma career coming to an end : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माकडून अपेक्षित कामगिरी त्याला आतापर्यंत करता आलेली नाही. रोहित शर्मा मालिकेतील पहिल्या कसोटीनंतर संघात सामील झाला असून आतापर्यंत त्याची बॅट तळपलेली नाही. मेलबर्नमधील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही रोहितची बॅट शांत राहिली. केवळ तीन धावा करून तो बाद झाला. त्याच्या या खेळीनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क वॉने मोठे वक्तव्य केले आहे. त्याच्या मते, रोहित शर्माची कसोटी कारकीर्द संपण्याच्या मार्गावर आहे.

रोहित शर्माचा फ्लॉप शो कायम –

गेल्या ८ कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या बॅटमधून एकही मोठी खेळी आलेली नाही. गेल्या १४ डावांमध्ये रोहितने ११.०७ च्या सरासरीने केवळ १५५ धावा केल्या आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना फ्लॉप झाल्यानंतर रोहित मेलबर्नमध्ये यशस्वी जैस्वालसोबत सलामीला आला, पण पहिल्या डावातही त्याची निराशा झाली. यानंतर तो सवालांच्या फेऱ्यात आला आहे.

रोहितची कसोटी कारकीर्द नक्कीच संपुष्टात येईल –

रोहितने आतापर्यंत या मालिकेतील चार डावांमध्ये ५.५० च्या सरासरीने केवळ २२ धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीबद्दल मार्क वॉ म्हणाला की, रोहित जर उर्वरित सामन्यांमध्ये काही करू शकला नाही, तर त्याची कारकीर्द नक्कीच संपुष्टात येईल. फॉक्स स्पोर्ट्सवर वॉ म्हणाला, ‘जर रोहित शर्मा शेवटच्या तीन डावात काही करू शकला नाही, तर मला वाटते की त्याची कारकीर्द नक्कीच संपुष्टात येईल.’

हेही वाचा – IND vs AUS : ‘रोहित शर्माला VIP वागणूक देणं थांबवा…’, हिटमॅनबद्दल माजी भारतीय खेळाडूचे मोठं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्माच्या शॉटवर टीका –

तसेच माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू केरी ओ’कीफे यांनेही रोहितच्या शॉटवर टीका केली. तो म्हणाला की, त्याच्या डावाच्या सुरुवातीला खेळणे खूप घाईचे होते. तो म्हणाला, ‘रोहित शर्माची ही खरोखरच मोठी चूक होती. हा एक वाईट शॉट आहे. स्विव्हल-पुल हा रोहित शर्माच्या आवडत्या शॉट्सपैकी एक आहे. हा खेळण्यासाठी त्याने डावाच्या सुरुवातीला खूपच घाई केली. त्याला वेगाचा आणि उसळीचा अंदाज आला नाही. भारतीय कर्णधारासाठी ही खेदजनक स्थिती आहे.’