Rohit Sharma Why Not Playing In Australia T20I & SA: भारताचा कर्णधार रोहित शर्माने विश्वचषक २०२३ मधील अंतिम पराभवानंतर आता एका महिन्याने मुंबई इंडियन्ससह एक खास व्हिडीओ शूट केला आहे. यावेळी त्याने आगामी सामन्यांमधून ब्रेक घेण्याचे कारण सुद्धा नमूद केले तसेच विश्वचषकातील पराभव किती जिव्हारी लागला याबाबतही त्याने पहिल्यांदाच भाष्य केले आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेतील आगामी कसोटी मालिकेत पुनरागमन करण्याआधी हा अत्यंत कठीण काळ मागे सारून कामावर परत जाण्यासाठी मदत केलेल्या कुटुंब आणि चाहत्यांचे आभार रोहितने मानले.

रोहितने मुंबई इंडियन्सच्या व्हिडिओमध्ये सांगितले की, “अहमदाबादमध्ये झालेल्या मोठ्या विश्वचषक फायनलच्या रात्रीनंतर मला असहाय्य वाटत होतं. मला यातून बाहेर कसं पडावं हेच कळत नव्हतं. मला काय करावं हे सुचत नव्हते. माझं कुटुंब आणि मित्रांनी मला मदत केली आणि माझ्या गोष्टी खूप सहज केल्या. प्रामाणिकपणे, हे कठीण होतं आणि पुढे जाणं इतकं सोपं नव्हतं, मी ५० षटकांचा विश्वचषक पाहत मोठा झालो आहे. आम्ही विश्वचषकासाठी इतकी वर्षं काम केलं, पण ठीक आहे. आयुष्यात तुम्हाला हवे ते मिळत नाही कधी तुम्ही निराश व्हाल, कधी खचून जाल.”

ऑस्ट्रेलियाविरुद्धची T20I मालिका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील व्हाईट-बॉल खेळांमधून रोहित शर्माला वगळण्याबाबत सुद्धा मधल्या कालावधीत प्रचंड चर्चा होती. या निर्णयाबाबत रोहितने उत्तर देताना सांगितले की, विश्वचषकाच्या अंतिम पराभवातून सावरण्यासाठी मला विश्रांती घ्यायची होती आणि कुटुंबासह वेळ घालवायचा होता. रोहित विश्वचषक संपताच कुटुंबासह सहलीला गेला होता.

Video: रोहित शर्मा T20 आणि दक्षिण आफ्रिका सामन्यात का खेळला नाही?

हे ही वाचा<< रोहित शर्माने पहिल्यांदा विश्वचषकातील पराभवावर सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही १० चुका केल्या, त्या रात्रीनंतर..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या पराभवानंतर रोहित व विराट कोहली हे मैदानात हताश दिसले होते, आणि या दोघांपैकी कोणीही मोठ्या पराभवानंतर विश्वचषक फायनलबद्दल बोलले नव्हते. दोघांनीही स्पर्धेनंतर ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता.