भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरने गर्लफ्रेंड मिताली परुळकरसोबत साखरपुडा केला आहे. त्यांच्या या मंगलमय सोहळ्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. शार्दुलच्या साखरपुड्याला भारताचा नवा टी-२० कप्तान रोहित शर्मानेही उपस्थिती नोदंवली. एका व्हिडिओयामध्ये टी-रोहित त्याचे अभिनंदन करत असताना आणि गळाभेट घेताना दिसत आहे. शार्दुलच्या साखरपुड्याला मोजकेच लोकच सहभागी झाले होते. शार्दुलने आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी केली होती. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघात त्याने भरीव योगदान दिले. या कामगिरीनंतर त्याला २०२१ च्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियामध्येही स्थान मिळाले आहे. https://twitter.com/OswalViren/status/1465284265470349314?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1465284265470349314%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-rohit-sharma-hugged-and-congratulated-shardul-thaker-watch-video-3873503.html हेही वाचा - IND vs NZ : कानपूरच्या मैदानावर शुबमन गिल बनला ‘सुपरमॅन’; सूर मारत घेतला अफलातून झेल; पाहा VIDEO अनेक वरिष्ठ खेळाडू गेल्या ६ महिन्यांपासून बायो बबलमध्ये असल्याने बीसीसीआयने वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली होती. शार्दुलने कसोटी क्रिकेटमध्येही आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. टीम इंडिया ७ किंवा ८ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. या भारतीय संघाला तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी-२० सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत शार्दुल ठाकूरला या दीर्घ दौऱ्यासाठी संघात स्थान मिळू शकते. मात्र, करोनाचे नवा प्रकार सापडल्यानंतर या दौऱ्याबाबत भीती व्यक्त केली जात आहे. पण भारतीय अ संघ अजूनही दक्षिण आफ्रिकेत आहे. अशा स्थितीत वरिष्ठ संघ आफ्रिकन दौऱ्यावरही जाऊ शकतो.