नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी (१ जानेवारी २०२३) बीसीसीआयची आढावा बैठक होईल, ज्यामध्ये मागील विश्वचषकाचा अहवाल सादर केला जाईल आणि पराभवाची कारणे पाहिली जातील. या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड, एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि कर्णधार रोहित शर्माही उपस्थित राहणार आहेत.

२०२२ हे वर्ष टीम इंडियासाठी चांगले नव्हते, जिथे भारत प्रबळ दावेदार असलेल्या आशिया कपच्या अंतिम फेरीतही पोहोचू शकला नाही. टी-२० विश्वचषकात खराब कामगिरी, दुखापतींच्या समस्या कायम होत्या. या सर्वांचे पोस्टमार्टम होईल, म्हणजे असे का होत आहे, यावर चर्चा होईल. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्यातील नियोजनावर चर्चा होईल. या पुढील रोडमॅप काय असेल, टीम इंडिया कशी पुढे जाईल आणि आगामी विश्वचषकाची तयारी कशी सुरू करावी.

बैठकीला कोण राहणार उपस्थित –

मालदीवमधून सुटी संपवून रोहित शर्मा मुंबईत परतणार आहे. तसेच राहुल द्रविडला मुंबईत यावे लागणार असून तोही या बैठकीला उपस्थित राहणार आहे. एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणही मुंबईत पोहोचणार आहेत. या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह देखील उपस्थित राहणार आहेत.

ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून, यातून केवळ मागील पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, तर भविष्यातील रोडमॅपवरही चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत एनसीए प्रमुख लक्ष्मण यांच्यासमोर एक मोठा प्रश्न असेल, ज्याचे उत्तर आणि उपाय त्यांना सांगावे लागणार आहे.

खेळाडूंना दुखापत का होतेय? एनसीए प्रमुखांसमोर प्रश्न –

एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासमोर बीसीसीआय एक मोठा प्रश्न विचारू शकते की, खेळाडूंना यापूर्वी इतक्या दुखापती कशा झाल्या. ज्यामध्ये जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, दीपक चहर यांच्यासह अनेक मोठे खेळाडू जखमी झाले होते. दोन सामने खेळल्यानंतर त्यांची दुखापतीने पुन्हा डोके वर काढले आहे, त्याचा परिणाम मोठ्या स्पर्धांमध्येही दिसून आला. हे का होत आहे, चूक कुठे होत आहे आणि त्यावर योग्य उपाय कसा शोधायचा.

एनसीए खेळाडूंच्या दुखापतींचे व्यवस्थापन पाहतो, त्यामुळे त्याचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनाही बैठकीत बोलावण्यात आले आहे. लक्ष्मण हे टीम इंडियाचे अंतरिम प्रशिक्षक म्हणूनही भूमिका बजावत आहेत, त्यामुळे त्यांच्याशी पुढील भविष्याबद्दल चर्चा केली जाईल. कदाचित बीसीसीआय त्याच्याकडे पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून पाहत असेल.

हेही वाचा – ख्रिस्तियानो रोनाल्डोने ‘या’ क्लबशी केला फुटबॉल इतिहासातील विक्रमी करार; मेस्सीपेक्षा मिळाले पाचपट अधिक पैसे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडिया आपला पहिला सामना मुंबईतच श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. ३ तारखेला होणाऱ्या या सामन्यासाठी रोहितला कसेही करून मुंबई गाठायची होती. या भेटीत रोहितसोबत या मालिकेवरही चर्चा होणार आहे. टीम इंडिया या टी-२० मालिकेनंतर ३ वनडे खेळणार आहे, जी मिशन वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे.