scorecardresearch

IND vs AUS Test: रोहित शर्माचे स्वप्न राहिले अपूर्ण: धोनीच्या ‘या’ खास क्लबमध्ये सामील होण्याची हुकली संधी

Border Gavaskar Trophy 2023: एमएस धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाला मायदेशात क्लीन स्वीप केले होते. हा पराक्रम धोनीच्या अगोदर ही कोणत्या कर्णधाराला जमला नव्हता. तसेच आता ही कोणाला जमलेला नाही.

India vs Australia Test Series Ms dhoni and rohit sharma
रोहित शर्मा आणि एमएस धोनी (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

India vs Australia Test Series 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ चे पहिले दोन सामने जिंकून टीम इंडियाने वर्चस्व राखले. त्यानंतर तिसऱ्या सामन्या भारतीय संघाला ९ विकेटसने पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माचे धोनीच्या एका खास क्लबमध्ये सामील होण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.

नागपूरमध्ये भारताने एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला, तर दिल्लीत पाहुण्यांचा ६ विकेट्सने पराभव झाला. या दोन सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियन संघ गार झाल्याचे दिसत होते. चार सामन्यांच्या या मालिकेत रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप करून मालिका तर जिंकेलच, पण धोनीच्या खास क्लबमध्येही आपले स्थान निर्माण करेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना होती.

पण इंदोर कसोटीत कांगारूंनी आपला शानदार खेळ दाखवत स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ९ विकेट्स राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे भारताची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची प्रतीक्षा लांबली आहे. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनीच्या क्लबमध्ये सामील होण्याचे रोहित शर्माचे स्वप्न भंगले आहे.

महेंद्रसिंग धोनी एकमेव भारतीय कर्णधार –

महेंद्रसिंग धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाचा मायदेशात धुव्वा उडवला आहे. होय, त्यांच्यापूर्वीचा कोणताही कर्णधार हा पराक्रम करू शकला नाही. त्याचबरोबर त्याच्या जाण्यानंतरही कोणीही करू शकला नाही. धोनीने २०१३ मध्ये हा इतिहास रचला. त्यावेळी भारत दौऱ्यावर आलेल्या कांगारू संघाला भारताने ४-० ने क्लीन स्वीप दिला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अनेक वेळा भारतात आला आहे, मात्र या संघाला एकाही भारतीय कर्णधाराला क्लीन स्वीप देता आला नाही.

हेही वाचा – WPL 2023 MI vs GG: गुजरात जायंट्सला पहिल्याच सामन्यात मोठा धक्का; बेथ मुनीला दुखापत झाल्याने अडचणी वाढल्या

यापूर्वी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली भारताचा दौरा केला होता. तेव्हा भारताने २-१ ने मालिका जिंकली होती. कांगारूंनी मालिकेतील पहिला सामना ३३३ धावांच्या फरकाने जिंकून खळबळ उडवून दिली होती, मात्र त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. त्यानंतर पुढील तीनपैकी दोन सामने जिंकले. या मालिकेतील एक सामना अनिर्णित राहिला.

हेही वाचा – IPL 2023: आयपीएलच्या १६ व्या हंगामासाठी सीएसकेने फुकले रणशिंग; धोनीच्या सरावाचा VIDEO होतोय व्हायरल

रोहित शर्माला मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून धोनीच्या खास क्लबमध्ये सामील होण्याची मोठी संधी होती, पण ती हुकली. आता मालिकेतील शेवटच्या कसोटीत टीम इंडियाला विजय मिळवून देऊन डब्ल्यूटीसी फायनलचे तिकीट मिळवून देण्यालवर भारतीय कर्णधाराची नजर असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ९ मार्चपासून चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 14:14 IST
ताज्या बातम्या