T20 World Cup 2024 Namibia vs Oman Highlights: नामिबियाने टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ओमान संघावर शानदार विजय मिळवला. डेव्हिड व्हिसाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने एकतर्फी सामना जिंकला. पण सुपर ओव्हरपूर्वी नामिबिया अवघ्या १०९ धावांवर ओमानला सर्वबाद केले. ओमानला सर्वबाद करण्यात नामिबियाच्या रूबेन ट्रम्पलमॅनने शानदार कामगिरी केली. त्याने या कामगिरीसह एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे, जो टी-२० क्रिकेटच्या इतिहासात कोणीही करू शकलेले नाहीत.

नामिबियाचा गोलंदाज रूबेन ट्रम्पलमॅन संघाला चांगली सुरूवात करून दिली. रूबेन नव्या चेंडूसह ओमानच्या सलामीवीरांना झटपट बाद केले. रूबेनने नामिबियाकडून गोलंदाजी आक्रमणाला सुरूवात केली. पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेत संघाला त्याने अपेक्षित अशी सुरूवात करून दिली. त्याने या सामन्यात ४ षटकांत केवळ २१ धावा देत ४ मोठे विकेट्स मिळवले. रूबेन ट्रम्पलमॅनची ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वाेत्कृष्ट संख्या आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: वर्ल्डकपमध्ये सुपर ओव्हरचा थरार; डेव्हिड व्हिसा ठरला नामिबियाच्या विजयाचा शिल्पकार

नामिबियाच्या गोलंदाजीची जबाबदारी रुबेन ट्रम्पलमॅनने घेतली. त्याने पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ओमानच्या कश्यप प्रजापतीला बाद केले. यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने ओमानचा कर्णधार आकिब इलियासची विकेट घेतली. सामन्याच्या पहिल्या दोन चेंडूत दोन विकेट घेणारा रुबेन ट्रम्पलमन हा टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी करता आली नव्हती. यानंतर रुबेन ट्रम्पलमनने ओमानविरुद्ध नसीम कुशीची विकेटही घेतली.

हेही वाचा – हार्दिक-नताशाच्या घटस्फोट प्रकरणात मोठी अपडेट, पंड्याच्या बायकोने इन्स्टाग्रामवर पुन्हा केला बदल, ‘ते’ फोटो…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुबेन ट्रम्पलमॅनने २०२१ मध्ये नामिबियासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने नामिबिया संघासाठी २८ टी-२० सामन्यात २५ विकेट घेतले आहेत. याशिवाय त्याने ३८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६३ विकेट घेतल्या. डावाच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट्स घेणं ही रूबेनच्या गोलंदाजीची खासियत आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ७६ विकेट्स आहेत. नामिबियाचा संघ यापूर्वी टी-२० विश्वचषकामध्ये दोन वेळा सहभागी झाला होता. या संघाने २०२१ आणि २०२२ मध्ये टी-२० विश्वचषक खेळला. टी-२० विश्वचषक २०२४ साठी नामिबियाचा संघ ब गटात आहे. या गटात नामिबियाशिवाय ओमान, स्कॉटलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आहेत.