Ruturaj Gaikwad broke Martin Guptill’s record : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय संघाने ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. त्याचबरोबर ४-१ अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली. या सामन्यात सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडला मोठी खेळी खेळण्यात यश आले नाही आणि तो केवळ १० धावा करून बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने २ चौकारही मारले आणि न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
ऋतुराज गायकवाडने मोडला मार्टिन गप्टिलचा विक्रम –
ऋतुराज गायकवाडने या सामन्यात १० धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिला आला. ऋतुराज गायकवाडने या मालिकेत कांगारू संघाविरुद्ध ५ सामन्यात २२३ धावा केल्या आणि मार्टिन गप्टिलला मागे टाकले. याआधी, गुप्टिलने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत एकूण २१८ धावा केल्या होत्या, पण आता तो दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. या यादीत विराट कोहली १९९ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
२२३ धावा – ऋतुराज गायकवाड (२०२३)
२१८ धावा – मार्टिन गुप्टिल (२०२१)
१९९ धावा – विराट कोहली (२०१६)
हेही वाचा – IND vs AUS 5th T20 Highlights: अर्शदीपची भेदक गोलंदाजी; भारताने शेवटच्या ट्वेन्टी२० सह मालिका ४-१ने जिंकली
ऋतुराज गायकवाडने टी-२० द्विपक्षीय मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत आपले नाव कोरले. इंग्लंडविरुद्ध विराट कोहली २३१ धावांसह अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध २२४ धावांसह केएल राहुल या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचाही या यादीत समावेश आहे.
टी-२० द्विपक्षीय मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
२३१ – विराट कोहली विरुद्ध इंग्लंड
२२४ – केएल राहुल विरुद्ध न्यूझीलंड
२२३ – ऋतुराज गायकवाड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२०६ – इशान किशन विरुद्ध दक्षिण आफ्रिका
२०४ – श्रेयस अय्यर विरुद्ध श्रीलंका
ऋतुराज गायकवाडने इशान किशनच्या विक्रमाशी केली बरोबरी –
ऋतुराज गायकवाडने या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध एकूण २१ चौकार मारले आणि त्याने इशान किशनच्या विक्रमाशी बरोबरी केली. यापूर्वी, भारताकडून कोणत्याही द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम इशान किशनच्या नावावर होता, ज्याने २०२२ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत २१ चौकार मारले होते.
टी-२० द्विपक्षीय मालिकेत भारतासाठी सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज –
२१ – ऋतुराज गायकवाड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२३)
२१ – इशान किशन विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२२)
२० – विराट कोहली विरुद्ध इंग्लंड (२०२१)
२० – श्रेयस अय्यर विरुद्ध श्रीलंका (२०२२)
२० – सूर्यकुमार यादव विरुद्ध इंग्लंड (२०२२)