गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज विजय हजारे ट्रॉफी २०२२ स्पर्धेतील फायनल सामना खेळला जात आहे. हा सामना सौराष्ट्र आणि महाराष्ट्र संघात होत आहे. या सामन्यात महाराष्ट्राने कर्णधार ऋतुराज गायकवाडकडे झळकावलेल्या शतकाच्या जोरावर, ९ बाद २४८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सौराष्ट्र संघापुढे २४९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

फायनल सामन्यात सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या महाराष्ट्र संघाकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने शतक झळकावले. ऋतुराजने १३१ चेंडूत १०८ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ४ षटकार लगावले.

हेही वाचा – KL Rahul Athiya Marriage: बीसीसीआयकडून केएल राहुलला मिळाली रजा; ‘या’ महिन्यात करणार अथिया शेट्टीशी लग्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचबरोबर अझीम काझीने ३३ चेंडूत३७ धावा केल्या. तसेच महाराष्ट्राच्या इतर खेळाडूंना काही खास कामगिरी करता आली नाही.दरम्यान सौराष्ट्र संघाकडून गोलंदाजी करताना कुशांग पटेलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४३ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर कर्णधार जयदेव उनाडकट, प्रेरक मंकड आणि पार्थ भुत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.