Andrew Symonds Death : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅन्ड्र्यू सायमंड्सचे कार अपघातामध्ये निधन झाल्यानंतर संपूर्ण क्रिकेटविश्वाला धक्का बसलाय. त्याच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात असून क्रिकेट जगतातील दिग्गजांनी या वृत्तानंतर दु:ख व्यक्त केले आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरनेही अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा >>> शिखर धवन, हार्दिक पांड्या यांच्याकडे मोठी जबाबदारी, भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता

“अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचे निधन म्हणजे सर्वांसाठीच एक धक्कादायक बातमी आहे. तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता. तो मैदानावर पूर्ण शक्तीने खेळायचा. मुंबई इंडियन्ससाठी आम्ही सोबत खेळलेलो आहेत. या फ्रेंचायझीसोबत खेळतानाच्या आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. अशा कठीण काळात मी त्याचे कुटुंबीय आणि मित्रांप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो,” असे सचिनने म्हटले आहे.

हेही वाचा >>> Andrew Symonds चा कार अपघातात मृत्यू; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या निधनाने क्रिकेटविश्व हादरले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्ने ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळले आहेत. व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व असणाऱ्या कालावधीत म्हणजेच १९९७ ते २००७ दरम्यान सायमंड्स हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग होता. त्याने आपल्या काळात गोलंदाजी तसेच फलंदाजी अशा दोन्ही विभागांत नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. त्याच्या निधनाच्या वृत्तानंतर विराट कोहलीनेही शोक व्यक्त केला आहे. अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सच्या निधानाचे वृत्त दुखद आणि धक्कादायक आहे. त्याच्या आत्म्यात शांती लाभो. तसेच अशा कठीण काळात त्याच्या कुटुंबियांना बळ मिळो, असे विराट कोहलीने म्हटले आहे.