Salman Butt’s reaction to Virat Kohli’s captaincy: विराट कोहलीने भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडल्याबद्दल पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बटने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की विराट कोहलीसाठी हळूहळू अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याला स्वतःच कर्णधारपद सोडावे लागले. सलमान बट्टने विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेचा हवाला दिला, ज्यामध्ये कोहलीने त्याच्याशी कोणतेही संभाषण झाले नसल्याचे सांगितले होते.

खरं तर, अलीकडेच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते की, विराट कोहली स्वतः कर्णधारपदावरून पायउतार झाला आणि त्याला कोणीही हटवले नाही. ते म्हणाले की, बीसीसीआयला वाटत होते की, विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडू नये. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कोहलीने हा निर्णय घेतला, तेव्हा आम्हालाही आश्चर्य वाटले. कर्णधारपद का सोडले हे फक्त विराट कोहलीच सांगू शकतो.

विराट कोहलीबद्दल सलमान बटचे धक्कादायक विधान –

सलमान बटने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एका संवादादरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “विराट कोहली हा एक यशस्वी कर्णधार होता आणि ज्या प्रकारे त्याला एक-एक करुन हटवण्यात आले, त्याने स्वतःच कर्णधारपद सोडले होते. कोहलीने स्वतःच कर्णधारपद सोडले होते आणि त्याला हटवण्यात आले नव्हते अशी अनेक विधाने मी वाचली आहेत.”

हेही वाचा – AFG vs BAN: बांगलादेशच्या नजमुल हुसेन शांतोने रचला इतिहास, विराट-रोहितच्या ‘या’ खास क्लबमध्ये झाला सामील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान बट पुढे म्हणाला, “बघा, बोर्डाने (बीसीसीआयने) असे वातावरण निर्माण केले की त्याला कर्णधारपद सोडावे लागले. विराट कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले होते की, त्याच्याशी कोणतीही चर्चा झाली नव्हती. जर तुम्ही ती पत्रकार परिषद पाहिली नसेल तर तुम्ही ती पाहू शकता.” दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील कर्णधारपद सोडले. त्याचवेळी, यापूर्वी त्याने वनडे आणि टी-२० मध्येही कर्णधारपद सोडले होते.